
नागपूरमध्ये पोलिसांचा मोठा छापा; बनावट गुडनाइट उत्पादनांचा जाळा उध्वस्त
मुंबई : घरगुती कीटकनाशक ब्रँड गुडनाइटची बनावट उत्पादने तयार करणाऱ्या बेकायदेशीर कारखान्यावर नागपूर पोलिसांनी मोठा छापा टाकला आहे. ही कारवाई गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (जीसीपीएल) आणि महाराष्ट्र पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आली.
स्थानिक पोलिस आणि जीसीपीएलच्या तपास यंत्रणेच्या मदतीने ह्या कारखान्याचा शोध लावला गेला. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात बनावट गुडनाइटची सामग्री जप्त करण्यात आली आहे. जप्त वस्तूंपैकी 10,937 रिकामे गुडनाइट बॉक्स, 2,641 बनावट स्टिकर्स, 7 रिकामे कार्टन आणि 2 तयार बनावट गुडनाइट उत्पादने समाविष्ट आहेत.
या कारवाईत आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कायदा 2023 च्या कलम 318 (4) अंतर्गत FIR नोंदवण्यात आली आहे. पोलिस आता या रॅकेटशी संबंधित संपूर्ण पुरवठा नेटवर्क व संपर्कांचा शोध घेत आहेत. गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडचे मुख्य विपणन अधिकारी भारत अश्विन मूर्ती यांनी सांगितले, “बनावट उत्पादनांचा प्रसार देशातील FMCG उद्योगासाठी गंभीर विषय आहे. अशा उत्पादनांमुळे ग्राहकांचा विश्वास कमी होतो आणि मानवी आरोग्यास धोका निर्माण होतो. आम्ही स्थानिक अधिकारी व ग्राहकांशी सहकार्य करून नियमितपणे आमच्या उत्पादनांची गुणवत्ता तपासतो. महाराष्ट्र पोलिसांसोबत हा उपक्रम डुप्लिकेट गुडनाइट उत्पादनांना रोखण्यास महत्त्वपूर्ण ठरेल.”
ग्राहकांनी बाजारात खरेदी करताना सावधगिरी बाळगावी, योग्य बिल घेणे आवश्यक आहे. जर कोणत्याही व्यक्तीकडून डुप्लिकेट गुडनाइट उत्पादने मिळाली, तर ग्राहक care@godrejcp.com वर माहिती पाठवू शकतात किंवा 1800-266-0007 वर फोन करून तक्रार नोंदवू शकतात. ही कारवाई बनावट वस्तूंचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी चेतावणी ठरत आहे, तर ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी जीसीपीएलची वचनबद्धता स्पष्ट करते.
बनावट Goodknight उत्पादने बनवणाऱ्या बेकायदेशीर कारखान्यावर पोलिसांचा छापा