
मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा; लातूर, नांदेड व धाराशिव जिल्ह्यांतील शाळांना आज सुट्टी
मुंबई : मराठवाड्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने आज, 27 सप्टेंबर रोजी लातूर, नांदेड आणि धाराशिव या तीन जिल्ह्यांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यानुसार खबरदारीचा उपाय म्हणून या तीनही जिल्ह्यांतील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
लातूर जिल्ह्यासाठी हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी तातडीचा निर्णय घेत सर्व अंगणवाडी, जिल्हा परिषद व नगरपालिका शाळा, खासगी व अनुदानित शाळा, आश्रमशाळा, महाविद्यालये तसेच खासगी शिकवणी वर्ग आणि आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्रांनाही सुट्टी दिली आहे.
दरम्यान, नांदेड जिल्ह्यासाठी कालच ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला होता. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने शाळांना सुट्टी दिली असून अंदाज तंतोतंत खरा ठरला आहे. पहाटे चार वाजल्यापासूनच नांदेड शहरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.
धाराशिव जिल्ह्यासाठीही आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. संभाव्य पावसाचा धोका लक्षात घेऊन जिल्हाधिकारी मैनाक घोष यांच्या सूचनेनुसार सर्व शाळांना आज सुट्टी देण्यात आली आहे.
प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे, अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता असून, संबंधित जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
————————————-
नम्र निवेदन
“निर्भीड, नि:पक्ष, निस्पृह पत्रकारितेसाठी तुमचे सहकार्य गरजेचे आहे…”लोकशाही मूल्यांची जपणूक, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची निष्ठा, आणि समाजजाणिवेची पायाभरणी हेच गौरव प्रकाशनचे ध्येय आहे. निर्भय, नि:पक्ष आणि लोकहितवादी पत्रकारिता हे आमचे बोधवाक्य आम्ही केवळ शब्दापुरते न ठेवता कृतीत उतरवत आहोत.
या सत्यशोधन आणि परिवर्तनाच्या प्रवासात तुमच्या आर्थिक सहकार्याची नितांत गरज आहे. आपले थोडेसे योगदान आमच्या निर्भय पत्रकारितेस बळ देऊ शकते. खालील QR कोड स्कॅन करून आपण आपल्या परीने मोलाचे सहकार्य करू शकता. चला, एकत्र येऊन समाजपरिवर्तनाच्या या वाटचालीत सहभागी होऊया. कारण खरी पत्रकारिता केवळ बातम्या देत नाही, तर भविष्यास आकार देते.
-बंडूकुमार धवणे
संपादक गौरव प्रकाशन

————————————-
————————————-
राज्यात मुसळधार पावसाचा इशारा!
————————————-
————————————-