जगात आईविषयी खुप लिहिल्या गेलं
पण मला फारसं नाही लिहिता आलं
आई अशी होती,आई तशी होती म्हणतात
पण मी काय सांगू, माझी आई कशी होती?
अजूनही मला शब्दात बांधता आलं नाही
कदाचित माझ्या शब्दास पेलवत नसावी
एवढंच सांगेन, वडील गेल्यावर आई
फोटोतल्या माईसारखी दिसत होती .
– अरुण विघ्ने
Post Views: 173
Like this:
Like Loading...