Sunday, October 26

दिवाळीनंतर निवडणुकीचा बिगुल! जानेवारीत मुंबईसह २९ महापालिकांच्या निवडणुका, आचारसंहिता लांबणार

महापालिका निवडणूक २०२६ : मुंबईसह महाराष्ट्रात तीन टप्प्यांत निवडणुका

दिवाळीनंतर निवडणुकीचा बिगुल! जानेवारीत मुंबईसह २९ महापालिकांच्या निवडणुका, आचारसंहिता लांबणार

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अखेर तीन टप्प्यांत घेण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने अंतिम टप्प्यात नेला आहे. यामध्ये मुंबईसह २९ महापालिकांच्या निवडणुका जानेवारी २०२६ मध्ये होणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.

दिवाळीनंतर लगेच नोव्हेंबर महिन्यात पहिल्या टप्प्यात निवडणुकीचा बिगुल वाजणार असून, त्यामुळे राज्यात राजकीय फटाक्यांची आतषबाजी सुरू होणार आहे. मात्र या निवडणुकीमुळे आचारसंहितेचा कालावधी मोठ्या प्रमाणात लांबणार असून, विकासकामांना फटका बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका दीर्घकाळ रखडलेल्या आहेत. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२६ पूर्वी सर्व निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. आदेशाची अधिकृत प्रत आयोगाला अद्याप मिळालेली नसली तरी निवडणूक कार्यक्रमाचे नियोजन सुरू आहे.

महापालिका निवडणूक २०२६ : मुंबईसह महाराष्ट्रात तीन टप्प्यांत निवडणुका

तीन टप्प्यांचा आराखडा

  • पहिला टप्पा (नोव्हेंबर २०२५) : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका
  • दुसरा टप्पा (डिसेंबर २०२५) : नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुका
  • तिसरा टप्पा (जानेवारी २०२६) : मुंबईसह २९ महापालिकांच्या निवडणुका

राज्य निवडणूक आयोगाकडून हा अधिकृत प्रस्ताव लवकरच राज्य सरकारला पाठविण्यात येणार असून, निवडणुकीचा अंतिम कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.

आचारसंहिता क्षेत्रापुरतीच

तीन टप्प्यांतील निवडणुकांमुळे राज्यात नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान निवडणूक आचारसंहिता लागू राहण्याची शक्यता आहे. अर्थात ही निवडणूक आचारसंहिता संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था क्षेत्रापुरती लागू असणार आहे. शिवाय राज्य सरकारचे हिवाळी अधिवेशनही छोट्या कालावधीचे करण्यात येणार असल्याचे समजते.

आयोगाकडून तयारी

मुंबई आणि इतर २९ महापालिका निवडणुकांच्या तयारीला काहीसा अवकाश आहे. मात्र, जिल्हा परिषदा; तसेच नगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व तयारी जवळपास होत आली आहे. त्यामुळे पहिल्या दोन टप्प्यांत या निवडणूक पार पडणार आहेत. तर, येत्या ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत मुंबई महापलिका तसेच इतर महापालिकांच्या प्रभाग रचेनेचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे समजते..


  • नम्र निवेदन
    “निर्भीड, नि:पक्ष, निस्पृह पत्रकारितेसाठी तुमचे सहकार्य गरजेचे आहे…”लोकशाही मूल्यांची जपणूक, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची निष्ठा, आणि समाजजाणिवेची पायाभरणी हेच गौरव प्रकाशनचे ध्येय आहे. निर्भय, नि:पक्ष आणि लोकहितवादी पत्रकारिता हे आमचे बोधवाक्य आम्ही केवळ शब्दापुरते न ठेवता कृतीत उतरवत आहोत.
    या सत्यशोधन आणि परिवर्तनाच्या प्रवासात तुमच्या आर्थिक सहकार्याची नितांत गरज आहे. आपले थोडेसे योगदान आमच्या निर्भय पत्रकारितेस बळ देऊ शकते. खालील QR कोड स्कॅन करून आपण आपल्या परीने मोलाचे सहकार्य करू शकता. चला, एकत्र येऊन समाजपरिवर्तनाच्या या वाटचालीत सहभागी होऊया. कारण खरी पत्रकारिता केवळ बातम्या देत नाही, तर भविष्यास आकार देते.
    -बंडूकुमार धवणे
    संपादक गौरव प्रकाशन
QR

हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!


दिवाळीनंतर राजकीय फटाके…


Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणेबंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.