Sunday, October 26

कोजागिरी.!

कोजागिरी पौर्णिमा कविता – अंकुश शिंगाडे यांची सामाजिक मराठी कविता

कोजागिरी

कोजागिरीच्या दुधानं

अशी शक्ती द्यावी

आम्ही धष्टपुष्ट व्हावे

आमची बेरोजगारी जावी

नोकरी नाही मिळाली तरी

आम्ही कमजोर नसावे

कोणतेही कामधंदे

आम्ही स्वखुशीनं करावे

दारिद्र्यातील बापालाही

अर्थ प्राप्त व्हावा

आईचं धूरपाट

नजरेसमोर चालता व्हावा

यावे सुखमय दिवस

अनंत काळासाठी

शेतकरीही आमचा दाता

राहावा कधी न उपाशी

आमची बहिण अंचला

सुरक्षीत व्हावी

कोणी कलीने केव्हाही

कधी अब्रू न लुटावी

चंद्राची चांदणीही

सुखमय व्हावी

हुंड्यासाठी चांदणी

कधी न जळावी

ते दिवस परतीचे

आधार व्हावा मुलांचा

वृद्धाश्रमात पित्यांचा

कधी अंत न व्हावा

ऐसेच दिन यावे

रामराज्य दिसावे

अनाथ अपंगांचे

कधी स्वप्न न तुटावे

अंकुश शिंगाडे

नागपूर 

९३७३४५९४५०

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणेबंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.