Sunday, October 26

हे दीक्षाभूमी

"हे दीक्षाभूमी – क्रांतीची प्रेरणा आणि बौद्धमय भारत दर्शवणारी कविता"

हे दीक्षाभूमी !

हे क्रांती भूमी
तू आमच्यासाठी उजेडाचं झाड झालीस
विज्ञानवादी विचारांची
प्रज्ञा सावली झालीस

तुझ्या कुशीत विसावतांना
माणुसकीची ऊब मिळते
घरी परततांना सोबत
प्रज्ञेची शिदोरी मिळते

तुझी प्रेरणा डोक्यात आहेदीक्षाभूमी…
सदैव परिवर्तन पेरत राहू
समता,बंधुता,न्यायाच्या
मार्गावर आम्ही चालत राहू

आता तुच आमची प्रेरणा
तुच जगण्याची ऊर्जा
तुच अमुची युद्ध शाळा
आणि तुच अमुची क्रांतीज्वाळा
तुच मुक्तदाती अमुची…..

धम्मचक्र असेच गतीमान होत राहो
भारत बौद्धमयच्या दिशेने जात राहो !

अरूण ह.विघ्ने
रोहणा,आर्वी,वर्धा

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणेबंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.