Sunday, October 26

एफवायपासून युपीएससी अभ्यासक्रम : मुंबई विद्यापीठ-ठाणे महापालिकेचा करार

मुंबई विद्यापीठ आणि ठाणे महापालिकेच्या करारानंतर एफवायपासून युपीएससी अभ्यासक्रम सुरू

मुंबई : युपीएससीसह विविध स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना आता पदवी अभ्यासक्रमासोबतच तयारीची संधी मिळणार आहे. मुंबई विद्यापीठ आणि ठाणे महापालिकेच्या चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेमध्ये शुक्रवारी झालेल्या ऐतिहासिक करारामुळे एफवायपासूनच विद्यार्थ्यांना युपीएससी अभ्यासक्रम शिकता येणार आहे.

स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि अभ्यासक्रमाची माहिती मिळणे आवश्यक असते. मात्र अनेक विद्यार्थ्यांना ते व्यवस्थित मिळत नसल्याने अपयश येते. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने १९८७ मध्ये चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था स्थापन केली. आजवर हजारो विद्यार्थ्यांनी या संस्थेत शिक्षण घेतले असून आता या संस्थेने एक पाऊल पुढे टाकले आहे.

या महत्त्वाच्या करारावर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु रवींद्र कुलकर्णी आणि ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभराव यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी पालिकेचे उपायुक्त सचिन सांगळे, महादेव जगताप, डॉ. प्रसाद कानडे, प्र-कुलगुरु डॉ. अजय भामरे आदी मान्यवर उपस्थित होते.

या करारामुळे विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमाबरोबरच युपीएससी, आयएएस, आयपीएस तसेच इतर स्पर्धा परीक्षांची शास्त्रशुद्ध तयारी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणेबंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.