Tuesday, January 27

Gerenal

Gerenal

आरोग्यदायी शेवगा व त्याचे प्रक्रियायुक्त पदार्थ

शेवगा हे पीक कोरडवाहू शेतकर्‍यांसाठी वरदान ठरते. शेवग्याचे झाड अतिशय लवकर वाढते. भारतामध्ये बहुतेक सर्व उष्ण, आद्र्र हवामान असलेल्या ठिकाणी शेवग्याचे उत्पादन घेतले जाते. शेवग्याच्या शेंगा वर्षभर बाजारामध्ये उपलब्ध असतात. शेवग्यामध्ये भरपूर प्रमाणात पोषकतत्व आहेत. शेवग्याच्या पाने, शेंगा, कोवळ्या फांद्या आणि बियामध्ये पोषक घटक असतात.जीवनसत्व अ, ब आणि क, खनिज विशेत: लोह आणि सल्फर, सिस्टेनाइन, अमिनो आम्ले असतात. त्यात भरपूर पोषक घटक आणि रोगप्रतिकार घटक असतात. त्यामुळे शेवग्यचा विविध भागांचा वापर ३00 पेक्षा अधिक आजारांच्या उपचारामध्ये केला जातो. शेवग्याच्या शेंगा, पाने, बियांपासून विविध मूल्यवर्धित पदार्थ तयार करता येतात.शेवग्याचे आरोग्यदायी फायदे शेवग्याच्या पानाच्या रसाच्या सेवनाचे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. शेवग्यचा पानाचा रस मधाबरोबर घेतल्यास डायरिया, जुलाबावर गुणकारी आहे, या...
Gerenal

सोशल मीडिया आणि महिला

आपण बघतोच आहोत आधुनिक काळात सोशल मीडियाला जास्त महत्त्व दिल्या जाते.पत्येक जण छोटीशी गोष्ट असली तरी प्रसिध्दी साठी सोशल मीडिया नेटवर्कची मदत घेत असतात. नाव कमावतात काही दिवस तीच ती चर्चा सुरू असते. नंतर अचानक शांत होते. त्याला ना बुड ना शेंडा , ना रंग ना ढंग असतो. बरेच दा पुरुष सुध्दा सोशल मिडीयावर यायला कचरतात. पण महिला मात्र बेधडकपणे आपली मते मांडत असतात.मोकळेपणाने चर्चा करत असतात.वादविवाद चर्चेत सहभागी होतांना अभ्यास पुर्ण माहिती देत असतात.आपल्या आयुष्यातील एखादा प्रसंग शेअर करण्या सोबतच वर्ज्य समजल्या जाणाऱ्या विषयांत सुध्दा त्या सढळ मनाने लक्ष देतात. त्याच प्रमाणे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिला देखील कौटुंबिक जवाबदारी सांभाळून समाजात आपले वेगळे स्थान निर्माण करणा-या महिला आपल्या अवतीभवती आढळतात.शिक्षणच नव्हे तर त्यांच्यातला आत्मविश्वास, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम...
Gerenal

लवंग सेवनाचे फायदे

आपल्या घरात सहज उपलब्ध असणारी लवंग केवळ आपल्या अन्नाची चवच वाढवत नाही, तर शरीराला पौष्टिक घटक देखील मिळवून देते. प्राचीन काळापासून याचा उपयोग आयुर्वेदिक औषधी वनस्पती म्हणून केला जात आहे. चला तर, याचे फायदे जाणून घेऊयात.हे वाचा-गणेश उत्सवाचे बदललेले स्वरूप.!रात्री लवंगाचे सेवन केल्यास बद्धकोष्ठता, अतिसार, आंबटपणा यासारख्या पोटाच्या समस्यांपासून मुक्ती मिळते.लवंगामध्ये अँटी-ऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त आहे. त्यात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. जे मुरुम रोखण्यास उपयुक्त आहे.हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरजकोमट पाण्यासह लवंगाचे सेवन केल्याने दातदुखीपासून आराम मिळतो. हात पाय थरथरण्याच्या आजाराने ग्रस्त लोक यापासून मुक्त होण्यासाठी रात्री झोपायच्या आधी १ ते २ लवंगा घेऊ शकतात.दररोज लवंगाचे सेवन केल्यास आपली रोग प्रतिकारशक्ती वाढते. लवंग आपल्याला खोकला, सर्दी, विषाणूजन्य संसर्ग, ब्राँकायटिस, सायन...
Gerenal

सामना ब्रेन ट्युमरचा

ब्रेन म्हणजे मेंदू व ट्यूमर म्हणजे अनैसर्गिक वाढ होऊन निर्माण झालेली गाठ. मेंदूच्या पेशींच्या अनियंत्रित अनैसर्गिक अशा वाढीला ब्रेन ट्युमर असे म्हणतात. ही गाठ साधी अथवा कर्करोगाची असू शकते. मेंदूत शरीरातील सर्व जाणवांचे संदेश येत असतात व त्यावर आदेशही दिले जातात.हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरजश्‍वसन, रक्ताभिसरण, शरीराचा तोल राखणे, हालचाली करणे अशा सर्वच महत्त्वाच्या क्रियांचे नियंत्रण मेंदूतील केंद्रामार्फतच होत असते. या बाबींमुळे मेंदूत येणारी गाठ वा ट्यूमर हा खूप गंभीर विकार समजला जातो. मेंदूचे काही ट्युमर हे शस्त्रक्रिया करून मुळापासून काढून टाकता येतात. त्यांचा कोणताही परिणाम नंतर दिसत नाही.ब्रेन ट्यूमर मध्ये शरीरातील एखाद्या भागातील संवेदना नष्ट होणे, स्नायू शिथिल होणे, नष्क्रय होणे, झटके येणे, चक्कर येणे, डोके दुखणो अशी लक्षणे दिसतात. त्यामुळे अशी लक्षणे असलेल्या मेंदूची सिटीस्कॅन ...
Gerenal

प्रतिष्ठित प्रशासकीय सेवा

प्रशासकीय अधिकार्‍यांना मिळणारा मान, सन्मान, सोयी-सुविधा आणि संधी यामुळे विद्यार्थी या सेवांच्या परीक्षेसाठी जोमाने तयारी करतात. यूपीएससी उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवार विविध सेवांमध्ये रूजू होतात. आयएएस, आयपीएस, आयईएस, आयएफएस यासारखे प्रशासकीय सेवांचे विविध विभाग आहे.म्हणूनच यातला नेमका फरक काय, अशा सेवांमध्ये जाण्यासाठी नेमकं काय करायला हवं याविषयी जाणून घ्यायला हवं.गणेश उत्सवाचे बदललेले स्वरूप.!अनेकांचं आयएएस अधिकारी होण्याचं स्वप्न असतं. आयएएस म्हणजे इंडियन अँडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस (भारतीय प्रशासकीय सेवा). प्रशासकीय परीक्षा आणि मुलाखतींमध्ये उत्तीर्ण होऊन चांगली रँक मिळवणारे उमेदवार आयएएस बनतात.कायद्यांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने करण्याची जबाबदारी या अधिकार्‍यांवर असते. यासह नवी धोरणं आखण्याच्या तसंच कायदे बनवण्याच्या कामातही त्यांचा महत्त्वाचा वाटा असतो. विविध सरकारी खात्यांच...
Gerenal

बापाला हृदयात जपून ठेवू..…

बाप.…बाहेरून मुलांसाठी कठोर पण आतून फार नाजूक असलेला प्रत्येक घरातील देवमाणूस. कुटुंबाच्या हिताची काळजी घेणारा बापच असतो. मुलांना कामाहून परत येताना खाऊ आणायला कधीच न विसरणारा तोही बापच असतो. कधीकधी कामाच्या मनःस्तापाने रागाच्या भरात मुलांवर ओरडून काही क्षणातच सर्वकाही विसरून प्रेमाने आपल्याला जवळ घेतो तो बापच असतो. पहिल्यांदा आपल्या नाजूक हाताला धरून आपल्याला चालणे शिकवतो तो आपला बापच असतो. जगातल्या प्रत्येक मुलींसाठी तर बाप म्हणजेच सुपरहिरो असतो. बाप कधीच आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीसाठी आठवत नाही, पण मोठ्यात मोठ्या संकटाच्या वेळी " बापरे ! " हा शब्द आपल्या तोंडातून निघाल्याशिवाय राहत नाही. बाप कितीही कठोर दिसत असला तरी तो कधीच आपल्या मुलांसाठी आतून कठोर असूच शकत नाही. बाहेरून वादळासारखा दिसणारा पण आतून पणतीसारखा पेटून आपल्या कुटुंबाला प्रकाश देतो तो असतो जगावेगळा बाप.कोणताच बाप सणा...
Gerenal

ऋतूनुसार रंगांची निवड

उन्हाळा संपून पावसाळा सुरू होण्याच्या या ऋतूबदलाच्या काळात प्रावरणांच्या रंगांमध्येही बदल करावा लागतो. यंदाच्या सीझनमध्ये कोणते कलर्स ट्रेंडमध्ये आहेत यावर एक नजर टाकू.  मरून- प्रत्येक ड्रेस टाईपमध्ये या रंगाचं वेगळं स्थान आहे. या मान्सूनमध्येही हा रंग जलवा दाखवत आहे. या रंगाच्या शेड्सनी मनावर अधराज्य गाजवायला सुरुवात केली आहे. या रंगामध्ये मॅक्सी, जंपसूट, ऑफ शोल्डर टॉप, रिफिल्स टॉप, कोल्ड शोल्डर टॉप आणि शॉर्ट ड्रेस टेंडमध्ये आहेत.  ग्रीन शेड- ताजेपणाचं प्रतीक म्हणजे ग्रीन शेड. हा रंग प्रत्येक वर्णाच्या व्यक्तीला खुलून दिसतो. यात वॉर्म टोनमध्ये मस्टर्ड ग्रीन कलर, खाक आणि डार्क ग्रीन कलर पसंत केले जात आहेत. ट्रेंडचा विचार कराल तर ब्राईट ग्रीन किंवा पॅरेट ग्रीन कलरला महिलांची पसंती आहे. पीच- काही फॉर्मल इव्हेंट्सना क्लासिक लूक हवा असेल तर हा कलर बेस्ट आहे. पीच कलरचा बेल स्लीव्हजचा ड्रेस खास ...
Gerenal

जपा दातांचे आरोग्य

पुरेशी काळजी घेतली नाही तर दातांच्या नानाविध समस्या उत्पन्न होतात. दातांमध्ये पोकळी निर्माण होणं ही त्यातील एक समस्या आहे. मात्र काही उपायांनी ही समस्या टाळता येऊ शकते. याविषयी.. ॅ दातांमध्ये स्वत:चं संरक्षण करण्याची क्षमता असते. त्याचबरोबर दातांवरचं एनिॅमल टिकवून ठेवण्यात लाळ महत्त्वाची भूमिका बजावते पण तयार होणार्‍या आम्लाचा हल्ला परतवून लावण्यासाठी एवढं पुरेसं ठरत नाही. आम्लामुळे दातांमध्ये पोकळी निर्माण होते. दातांची झीजही होते. हे टाळण्यासाठी प्रयत्न करावे लागतात.ॅ दातांची योग्यप्रकारे काळजी घ्यायला हवी.दिवसातून दोन वेळा दात घासायला हवेत. दातांमध्ये अन्नकण अडकणार नाहीत याकडे कटाक्षाने लक्ष द्यायला हवं. माउथवॉशचा वापर करायला हवा. ॅ विशिष्ट प्रकारच्या अन्नामुळे तोंडात बॅक्टेरियांची निर्मिती होते. साखर तसंच कबरेदकांमुळे बॅक्टेरियांची झपाट्याने वाढ होते. हे बॅक्टेरिया विशिष्ट प्रकारच्या आ...
Gerenal

करिअर मर्चंट नेव्हीतले

जगभरात भ्रमंती करण्यासोबतच विविध ठिकाणच्या संस्कृतींची ओळख करून घेणं र्मचंट नेव्हीतल्या करीअरमुळे शक्य होतं. र्मचंट नेव्ही हा करीअरचा धाडसी पर्याय आहे. यात तुम्हाला वर्षातले सहा महिने बोटीवर रहावं लागतं. म्हणजे एवढा काळ तुम्ही समुद्रात असता. चहूबाजूला निळंशार पाणी खुणावत असतं. म्हणूनच उत्तम आणि धाडसी करीअरच्या विचारात असाल तर र्मचंट नेव्हीचा मार्ग तुम्ही निवडू शकता.र्मचंट नेव्हीमध्ये डेक कॅडेट किंवा नॅव्हिगेटिंग अधिकारी म्हणून तुम्ही काम करू शकता. हे अधिकारी बोट, इंधनाची टाक, कार्गो यांच्या देखरेखीची जबाबदारी पार पाडतात. र्मचंट नेव्हीच्या माध्यमातून माल वाहतूक होते. बोटीत माल भरणं आणि उतरवणं या कामांकडे डेक कॅडेटला लक्ष ठेवावं लागतं. पुरेशा अनुभवानंतर तुम्ही थर्ड ऑफिसर, सेकंड ऑफिसर आणि चीफ ऑफसर अशी पदं मिळवू शकता. र्मचंट नेव्हीमध्ये जाण्यासाठी फिजिक्स, केमस्ट्री आणि गणित हे विषय घेऊन बार...
Gerenal

मान्सून ट्रेकिंग स्पॉट्स

दोस्तांनो, ट्रेकर्स मान्सूनकाळात मोठय़ा प्रमाणावर ट्रेकिंगसाठी बाहेर पडतात. पावसाळा हा ट्रेकिंगसाठीचा सर्वोत्तम काळ मानला जातो. लवकरच मान्सूनचं आगमन होणार आहे. कोरोनाची प्रकरणं कमी होत असल्यामुळे येत्या काळात निर्बंध शिथिल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात ट्रेकिंगच्या योजना आखल्या जातील. तुम्हालाही ट्रेकिंगची आवड असेल तर या ठिकाणांचा विचार करता येईल. * हिमाचल प्रदेश हे पर्यटकांचं आवडतं ठिकाण. सध्या वर्केशनसाठीही अनेक जण हिमाचलला जातात. इथे ट्रेकिंगची अनेक ठकाणं आहेत. हाम्टा पास हे असंच एक ठिकाण. नवख्या ट्रेकर्ससाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे. कुल्लू खोर्‍यातल्या हाम्टा पासपासून या ट्रेकला सुरूवात होते. हा ट्रेक स्पती व्हॅलीपर्यंतचा ३५ कलोमीटरचा हा ट्रेक आहे. साधारण चार ते पाच दिवसात हा ट्रेक पूर्ण होतो. * लोणावळ्याजवळचा राजमाची किल्ला ट्रेकर्सना भुरळ पाडतो. राजमाचीचा ट्रेक सोपा असून ट...