
गौरव प्रकाशन पारनेर (प्रतिनिधी): पारनेर तालुक्यातील गटेवाडी येथे उद्योजक संतोष पवार यांनी कै. प्रवीण पवार व कै. सुजित पवार यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्ताने समाजहिताचा उपक्रम राबवत शेतकरी व विद्यार्थी बांधवांना मदतीचा हात दिला. या उपक्रमामध्ये गावातील सर्व शेतकऱ्यांना कृषी फवारणी पंप तर विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार काशिनाथ दाते उपस्थित होते. आपल्या भाषणात त्यांनी समाजहिताच्या या उपक्रमाचे कौतुक करताना भावना व्यक्त केल्या. “मी अशा प्रकारच्या कार्यक्रमाला पहिल्यांदाच आलो आहे. हजारो रुपये खर्च करून वक्ते बोलावण्यापेक्षा गावातील गरजू शेतकरी व विद्यार्थ्यांना मदतीचा हात देणे ही खऱ्या अर्थाने समाजसेवा आहे. संतोष पवार यांनी दाखवलेला हा मार्ग समाजासाठी दीपस्तंभ ठरेल,” असे दाते यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला तालुका भाजप अध्यक्ष राहुल शिंदे पाटील, सुपा गावचे माजी सरपंच नाना पवार, राळेगण थेरपाळ सरपंच पंकज कारखिले, गटेवाडी सरपंच सौ. मंगल पवार, सोसायटी व्हा. चेअरमन संजय पवार, मा. उपसरपंच सुनील पवार, शिक्षक नेते चंद्रकांत गट, ट्रान्सपोर्ट व्यावसायिक अनिल पवार, माजी सैनिक किसन पवार व संदीप गट, दुग्ध व्यावसायिक भगवान गट यांच्यासह ग्रामस्थ महिला-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी उद्योजक संतोष पवार यांनी भावनिक शब्दांत प्रवीण व सुजित यांच्या आठवणी जागवल्या. “जोवर मी आहे, तोवर त्यांच्या नावाने समाजहिताचे उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करेन. त्यांची आठवण जिवंत ठेवणे हीच खरी श्रद्धांजली असेल,” असे उद्गार त्यांनी काढले.
कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक झाले असून गटेवाडी गावात सामाजिक कार्याचा एक नवा आदर्श निर्माण झाल्याचे मानले जात आहे.
- नम्र निवेदन
“निर्भीड, नि:पक्ष, निस्पृह पत्रकारितेसाठी तुमचे सहकार्य गरजेचे आहे…”लोकशाही मूल्यांची जपणूक, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची निष्ठा, आणि समाजजाणिवेची पायाभरणी हेच गौरव प्रकाशनचे ध्येय आहे. निर्भय, नि:पक्ष आणि लोकहितवादी पत्रकारिता हे आमचे बोधवाक्य आम्ही केवळ शब्दापुरते न ठेवता कृतीत उतरवत आहोत.
या सत्यशोधन आणि परिवर्तनाच्या प्रवासात तुमच्या आर्थिक सहकार्याची नितांत गरज आहे. आपले थोडेसे योगदान आमच्या निर्भय पत्रकारितेस बळ देऊ शकते. खालील QR कोड स्कॅन करून आपण आपल्या परीने मोलाचे सहकार्य करू शकता. चला, एकत्र येऊन समाजपरिवर्तनाच्या या वाटचालीत सहभागी होऊया. कारण खरी पत्रकारिता केवळ बातम्या देत नाही, तर भविष्यास आकार देते.
-बंडूकुमार धवणे
संपादक गौरव प्रकाशन

हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदा
लोकांसाठी झटणारा, शेवटपर्यंत संघर्ष करणारा असा आमचा नेता …