
आमचं यवतमाळ
आमचं यवतमाळ
संजय दत्तने जरी घेतलं
उपहासाने नांव
आम्हास मात्र प्रिय आहे
आमचं यवतमाळ गांव
भाऊसाहेब पाटणकर,
बापुजी अणे, जवाहरलाल दर्डा
बावाजी दाते सारखा
वक्ता नाही खर्डा
श्रद्धे विषयी बोलणे नाही
अंधश्रद्धेच्या विरोधी बाणा
अभ्यासपूर्ण लिखाण ज्यांचे
सुजाण डॉक्टर अशोक राणा
ढुमणापूरचा मारुती,
जिनाचा गणपती,
लोहाऱ्याचा महादेव
कमी होते काय?
तुम्हीबी लावलेच नां राजेहो,
भुताच्या मंदीराले पाय
शहरामध्ये वाढत चालला
युवक-युवतींचा पसारा
एकट्या “श्याम” च्या मागे पडल्या
“सरोज” आणि “अप्सरा”
आकाशवाणी, दूरदर्शन
आणि चॅनेलचे थवे
पाठोपाठ येतेय येथे
नागपूर मेट्रो रेल्वे
दागिन्यांसाठी कैपिल्यवार,
शेतीसाठी पालतेवार,
कपड्यांसाठी निलावार मात्र
तब्येतीला फक्त राशतवार
टांगा चौकात टांगा नाही,
माइंदे चौकात माइंदे नाही,
दत्त चौकातल्या दत्ताची कृपा
मात्र सदैव बरसत राही
मैत्रीचे नियम पाळतात
खुदाचे बंदे, येशूचे भक्त
गरज पडता देतात ते
ऋग्णासाठी रक्त
पैशाच्या मागे पळ आणि
सत्ताधाऱ्यांचे पाय चेप
कधीच येथे घडले नाही
कणखर दैनिक सिंहझेप
पासष्ट वर्षांची अविरत सेवा
लचके डॉक्टरचा दवाखाना
अत्यल्प शुल्क आकारती ते
नजर ना लागो या श्रद्धास्थाना
येणार नाही संकट,
देतो तुम्हाला वचन
पाठीशी आहे तुमच्या,
येथे संकटमोचन
इथल्या एकीची इतरांना
कळलीच नाही मेख
गणपतीची मुर्ती बनवतात
वनकर आणि शेख
आमच्या गावात येऊन गेले
एकेक नर-सिंह,
बच्चन, नेहरू, इंदीरा गांधी
आणि दारासिंह
कमिटी स्थापली मान्यवरांनी
स्मशान बनले देवस्थान
प्रसन्न चित्ते येथून करती
पुण्यात्मे स्वर्ग प्रस्थान
अश्रु आता आवरतो अन्
खेद सांगतो मनातला
एके दिवशी सोडून गेली

आमची लाडकी “शकुंतला”
रानडेचे दूध आणि
सत्कारची मिठाई
बुढ्ढीचा चिवडा खाऊन
अंगी येते धिटाई
यवतमाळात राहण्याची
वेगळीच आहे मजा
चोपडेंच्या शेवयांनी सुटतो
रमजानचा रोजा
गाववाल्यांच्या प्रेमाचा हा
रवि चोपडे गुलाम
जन्मभुमीला माझा
आदरपुर्वक सलाम
रवि चोपडे पुणे
9028544461
———————————
———————————
———————————
- नम्र निवेदन
“निर्भीड, नि:पक्ष, निस्पृह पत्रकारितेसाठी तुमचे सहकार्य गरजेचे आहे…”लोकशाही मूल्यांची जपणूक, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची निष्ठा, आणि समाजजाणिवेची पायाभरणी हेच गौरव प्रकाशनचे ध्येय आहे. निर्भय, नि:पक्ष आणि लोकहितवादी पत्रकारिता हे आमचे बोधवाक्य आम्ही केवळ शब्दापुरते न ठेवता कृतीत उतरवत आहोत.
या सत्यशोधन आणि परिवर्तनाच्या प्रवासात तुमच्या आर्थिक सहकार्याची नितांत गरज आहे. आपले थोडेसे योगदान आमच्या निर्भय पत्रकारितेस बळ देऊ शकते. खालील QR कोड स्कॅन करून आपण आपल्या परीने मोलाचे सहकार्य करू शकता. चला, एकत्र येऊन समाजपरिवर्तनाच्या या वाटचालीत सहभागी होऊया. कारण खरी पत्रकारिता केवळ बातम्या देत नाही, तर भविष्यास आकार देते.
-बंडूकुमार धवणे
संपादक गौरव प्रकाशन

———————————