Tuesday, October 28

मेडिकलची संधी हुकलीय?

Medical

अनेकजण मेडिकलला जाण्याचं स्वप्न पाहत असतात. परंतु काही ना काही कारणांनी हे स्वप्न भंग पावतं. त्या स्थितीत निराश न होता इतर पर्यायांचा विचार करायला हवा. त्या विषयी..
बायोलॉजीमध्ये रस असणारे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी म्हणजे पीसीबीची निवड करतात. असे विद्यार्थी बॉटनी, झूलॉजी, मायक्रोबायोलॉजीसह मरीन बायोलॉजी, बायो केमिस्ट्री आणि जेनेटिक्ससारखे पर्याय निवडू शकतात. यात संशोधन, नवनिर्मितीबाबत बर्‍याच संधी आहेत.
पीसीएमबी हा गट निवडलेले विद्यार्थी बायोलॉजीशी संबंधित अंतर्गत विषय म्हणजे बायोटेक्नॉलॉजी, जेनेटिक्स इंजिनिअरींग, बायोमेडिकल इंजिनिअरींग, बायोस्टॅटिस्टिक्समध्येही करीअर करू शकतात. या विषयांमध्ये पदवी आणि नंतर द्विपदवीधर होऊ न उत्तम करीअर घडवू शकतात.

हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरज

आयुर्वेदिक, होमिओपॅथी, युनानी या शाखा निवडता येतात.हेल्थकेअर क्षेत्राशी संबंधित ऑप्टोमेट्री, ऑडियोलॉजी, फिजिओथेरपी, मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी, नर्सिंग, क्लिनिकल रिसर्च हे पर्यायही आहेत.हॉस्पिटल मॅनेजमेंट, हॉस्पिटल अँडमिनिस्ट्रेशनसारखे अभ्यासक्रम पूर्ण करून या क्षेत्रात करीअर करता येईल. क्लिनिकल सायकोलॉजी, हेल्थ सायकोलॉजी, चाईल्ड सायकोलॉजी, न्यूरो सायकोलॉजी हे पर्यायही उपलब्ध आहेत.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणेबंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.

Leave a Reply