Thursday, November 13

डोक्याला मार लागलाय?

22

घसरून पडल्याने, अपघात झाल्यास किंवा आपटल्यास डोक्याला मार लागतो. अनेकदा हा मार साधा असतो तर अनेकदा तो जीवघेणाही ठरतो. या आघाताने मेंदूला इजा होण्याची शक्यता असते. अशा वेळी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. डोक्याला मार लागल्याने मेंदू किंवा कवटीला इजा होण्याची शक्यता असते. अनेकदा डोक्याच्या आतल्या भागाला जखम होण्याचीही शक्यता असते. ही जखम उघड्या डोळ्यांना दिसत नाही. त्यामुळे तातडीने काही चाचण्या करण्याची गरज असते.

हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरज

अनेकदा एखादी वस्तू डोक्यात आरपार गेल्याने गंभीर स्वरूपाची इजा होऊ शकते. रस्ते अपघात, घरी किंवा कामाच्या ठिकाणी झालेला अपघात, भांडण, पडणं, खेळताना होणारी इजा यामुळे डोक्याला मार बसतो. बेशुद्ध पडणं, रक्तस्राव, उलट्या, नाकातून रक्त किंवा पाणी येणं, अचानक ऐकू न येणं, डोळ्यासमोर अंधारी येणं, चव, वास यांची जाणीव न होणं, बोलताना त्रास होणं, हृदयाचे अनियमित ठोके, पक्षाघात, कोमात जाणं, वागणुकीत बदल होणं, मानसिक आरोग्यविषयक समस्या निर्माण होणं ही डोक्याला मार लागल्याची तात्पुरती किंवा कायमस्वरूपी लक्षणं आहेत. म्हणूनच ही बाब गांभीर्याने घ्यायला हवी.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणेबंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.

Leave a Reply