
सीमोल्लंघन : परंपरेच्या बंधनातून संविधानाच्या उजेडातले पाऊल
होय आम्ही सिमोल्लंघन केलंय
कैक पिढ्याचं वेशीबाहेरचं
जगत असलेलं जीणं…
आज वेशीच्या आत आलंय ..
ओंजळीला ओठ लावून
तहान ओठांची भागवली होती
भेदभावाच्या चढून भिंती
आमचा पुर्वज लढला होता
त्याच भिंती भेदून आज
होय आम्ही सिमोल्लंघन केलंय.
परंपरेचे फेकून जोखड
गळ्यातलं टाकून मडके
कमरेचा फेकून झाडू
हाती कासरा घेऊन आलोय
संविधानानं जग जवळ केलय
होय आम्ही सिमोल्लंघन केलंय.

-प्रशांत वाघ
येवला
संपर्क ७७७३९२५०००