
आकांत
कोण ति-हाईत
जणू ऋणाईत
बैसला दारात…

कुणास सांगावे
उपेक्षित गावे
दुख-या स्वरात…
क्षीण छताखाली
अश्रुंच्या पखाली
धडकी ऊरात…
कष्टतो सर्वदा
भोगतो आपदा
भोळा अंधारात…
ऊन रखरख
दावते ओळख
जीव अंकुरात…
कल्लोळ गणांचा
पूर भावनांचा
ढुसे दिनरात…

- प्रभाकर तांडेकर ‘प्रदत्त’
५२-ब, साईनगर, गणेश अपार्टमेन्टजवळ,
दिघोरी नाका, नागपूर- 440034
(मो. 9421803498)
हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!