Sunday, October 26

चिखल्याचा एकनाथ वाघ : टिन पत्र्याच्या घरातून थेट हार्वर्ड विद्यापीठापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास

चिखल्याचा एकनाथ वाघ : टिन पत्र्याच्या घरातून थेट हार्वर्ड विद्यापीठापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास

चिखल्याचा एकनाथ वाघ : टिन पत्र्याच्या घरातून थेट हार्वर्ड विद्यापीठापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातल्या चिखला गावाचा गरिबाघरचा मुलगा आता जगप्रसिद्ध हॉर्वर्ड विद्यापिठात शिकायला जाणार आहे. या तरुणाचं नाव आहे एकनाथ भगवान वाघ.


एकनाथची कहाणी जिद्दीची आहे. स्वप्नांचा पाठलाग करणारी आहे. आई कासाबाई आणि वडील भगवानराव अडानी. घरी शिक्षणाचा कसलाच वारसा नाही. टिन पत्र्याचं घर. आजारी आई. पण एकनाथ शिकत राहिला. ग्रामीण भागातील एका साध्या कष्टकरी कुटुंबातून हार्वर्ड विद्यापीठापर्यंतचा त्याचा प्रवास साऱ्या तरुणाईसाठी प्रेरणादायी आहे. हावर्ड विद्यापीठामध्ये पब्लिक पॉलिसी या विषयाच्या पदव्युत्तर अभ्यासासाठी त्यास प्रवेश मिळाला आहे. विशेष हे की यासाठी त्याला महाराष्ट्र सरकारची परदेशी शिक्षणाची शिष्यवृत्ती मिळाली आहे. महाराष्ट्रातून मोजक्याच विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाची स्कॉलरशिप मिळते. त्यातही हॉवर्डसाठी एकनाथला ही स्कॉलरशिप मिळाली.


एकनाथचा हा संघर्षशील प्रवास त्याच्या गावात त्याच्या घरी जाऊन बघितला तर अक्षरशः डोळे भरून आले. टिन पत्र्याचे घर. प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुल योजनेत नाव आलं असल्याचं एकनाथचे वडील म्हणाले.
एकनाथच्या घरी कोणी शिकलेलं नव्हतं. बालपणा पासून अभ्यासात हुशार असणारा एकनाथ गावच्याच जि. प. शाळेत शिकला. आठवीत त्याची नवोदय विद्यालयात निवड झाली. हा त्यांच्या जीवनातील पहिला मोठा टप्पा. पुढे बारावी झाल्यावर एकनाथने पुण्याला फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पुण्यात त्याला सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात प्रवेश मिळाला. नंतर पुणे विद्यापीठातून त्यानं एम.ए. केले.

13OK


याच काळात एकनाथची एकलव्य फाउंडेशनच्या राजु केंद्रे यांच्याशी भेट झाली आणि जागतिक स्तरावर शिक्षण घेण्याची त्याच्या मनात जिद्द निर्माण झाली. “मी काहीतरी वेगळं करणार” स्वप्न आकार घेऊ लागलं. मागील वर्षीही हार्वर्डला नंबर लागला पण स्कॉलरशिप मिळाली नाही त्यामुळे त्याला जाता आलं नाही. पण तो धडपडत राहिला निवडीच्या विविध टप्प्यावर सिद्ध करत गेला आणि या वर्षी एकनाथची हार्वर्ड विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी निवड झाली.


एकनाथच्या आई-वडिलांच्या डोळ्यात आज यशाचे आनंदाश्रू आहेत. “आमच्या मुलाने एवढं मोठं नाव कमावलं, हे आमच्यासाठी स्वप्नवत आहे” असं ते म्हणतात…तर एकनाथ म्हणतो, “परिस्थिती कितीही प्रतिकूल असो, जर मनात जिद्द आणि चिकाटी असेल तर यश मिळणे अशक्य नाही.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्वप्नं मोठी बघायला हवीत. मेहनत घेतली तर कुणालाही हार्वर्डपर्यंत पोहोचता येऊ शकतं”

हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!
..
ग्रामीण भागातील वंचित समुदयातील मुलांना देशांतर्गत आणि देशाबाहेर उच्च शिक्षण संस्थात प्रवेशासाठी मेंटर्सचं मोठं नेटवर्क तयार करणारे माझे मित्र राजु केंद्रे सध्या जर्मनीत आहेत. त्यांनी या गुणी मुलाची दखल घेतल्या गेली पाहिजे असं मला कॉल करून कळवलं. आणि आज योग जुळून आला. 5 सप्टेंबरला एकनाथ पुण्याला जाणार आहे आणी 7 सप्टेंबरला त्याचं विमान अमेरिकेच्या दिशेने उड्डाण घेणार आहे. त्यामुळे आज भल्या पहाटे उठून नियोजनाप्रमाणेचिखला गाठलं. एकनाथची गगण भरारी ऐकून मेहकर विधानसभा मतदार संघाचे आ. सिद्धार्थ खरात यांनी उत्साहाने एकनाथच्या सत्काराला भरपूर वेळ दिला. एकनाथच्या आई बाबांसाठी कपड्यांचं गिफ्ट दिलं. एकनाथला ग्रंथ भेट दिली. आणि भरभरून बोलले.


विशेष म्हणजे यावेळी सिंदखेड राजा विधानसभा मतदार संघाचे आ. मनोज कायंदे यांनी त्यांचे बंधू सन्माननिय सतीश कायंदे यांना एकनाथच्या सत्काराला पाठवलं होतं. मा. सतीश कायंदे आणि मा. आ. सिद्धार्थ खरात यांनी एकनाथला शुभेच्छा दिल्या..एकनाथनं भावस्पर्शी मनोगत व्यक्त केलं. यावेळी लोकजागरचे प्रवीण गीते, उत्कर्ष फाउंडेशनचे विठ्ठल चव्हाण, एकलव्य फाउंडेशनचे प्रदीप पवार, गजानन पालवे, अमोल पैठणे आणि गावचे सरपंच गणेश काकड यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. खुप बरं वाटलं आज..

  • रवींद्र साळवे, बुलढाणा

• नम्र निवेदन
“निर्भीड, नि:पक्ष, निस्पृह पत्रकारितेसाठी तुमचे सहकार्य गरजेचे आहे…”
लोकशाही मूल्यांची जपणूक, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची निष्ठा, आणि समाजजाणिवेची पायाभरणी हेच गौरव प्रकाशनचे ध्येय आहे. निर्भय, नि:पक्ष आणि लोकहितवादी पत्रकारिता हे आमचे बोधवाक्य आम्ही केवळ शब्दापुरते न ठेवता कृतीत उतरवत आहोत.
या सत्यशोधन आणि परिवर्तनाच्या प्रवासात तुमच्या आर्थिक सहकार्याची नितांत गरज आहे. आपले थोडेसे योगदान आमच्या निर्भय पत्रकारितेस बळ देऊ शकते. खालील QR कोड स्कॅन करून आपण आपल्या परीने मोलाचे सहकार्य करू शकता. चला, एकत्र येऊन समाजपरिवर्तनाच्या या वाटचालीत सहभागी होऊया. कारण खरी पत्रकारिता केवळ बातम्या देत नाही, तर भविष्यास आकार देते.
-बंडूकुमार धवणे
संपादक गौरव प्रकाशन

QR 1


Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणेबंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.