मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश : मराठा आंदोलकांना २ सप्टेंबर दुपारी ४ वाजेपर्यंत हटवा
मुंबई : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनावर मुंबई उच्च न्यायालयाने कडक निर्देश दिले आहेत. न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, आझाद मैदानाव्यतिरिक्त मुंबईतील अन्य ठिकाणी जमलेल्या आंदोलकांना २ सप्टेंबर दुपारी ४ वाजेपर्यंत हटविण्यात यावे. तसेच मुंबईत येणाऱ्या आंदोलकांना मुंबई वेशीबाहेरच रोखून परत पाठवावे, असेही आदेश खंडपीठाने दिले आहेत.
हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!
न्या. रविंद्र घुगे आणि न्या. गौतम अनखड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यात न्यायालयाने निदर्शनास आणून दिले की आंदोलकांनी दिलेल्या परवानगीतील अटींचे उल्लंघन केले आहे. केवळ आझाद मैदानापुरती मर्यादित राहणारी परवानगी असूनही मोठी गर्दी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, चर्चगेट, हुतात्मा चौक परिसरात जमली आहे. त्यामुळे मुंबईतील वाहतूक व दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.
न्यायालयाने सांगितले की आंदोलन करणे हा मूलभूत अधिकार आहे; परंतु मुंबईकरांना वेठीस धरण्याचा अधिकार नाही. आदेशाचे पालन न झाल्यास राज्य सरकार आंदोलकांवर कायदेशीर कारवाई करू शकते. तसेच जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडल्यास तातडीने उपचार करावेत, असेही निर्देश देण्यात आले.
• नम्र निवेदन
“निर्भीड, नि:पक्ष, निस्पृह पत्रकारितेसाठी तुमचे सहकार्य गरजेचे आहे…”
लोकशाही मूल्यांची जपणूक, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची निष्ठा, आणि समाजजाणिवेची पायाभरणी हेच गौरव प्रकाशनचे ध्येय आहे. निर्भय, नि:पक्ष आणि लोकहितवादी पत्रकारिता हे आमचे बोधवाक्य आम्ही केवळ शब्दापुरते न ठेवता कृतीत उतरवत आहोत.
या सत्यशोधन आणि परिवर्तनाच्या प्रवासात तुमच्या आर्थिक सहकार्याची नितांत गरज आहे. आपले थोडेसे योगदान आमच्या निर्भय पत्रकारितेस बळ देऊ शकते. खालील QR कोड स्कॅन करून आपण आपल्या परीने मोलाचे सहकार्य करू शकता. चला, एकत्र येऊन समाजपरिवर्तनाच्या या वाटचालीत सहभागी होऊया. कारण खरी पत्रकारिता केवळ बातम्या देत नाही, तर भविष्यास आकार देते.
-बंडूकुमार धवणे
संपादक गौरव प्रकाशन
