मुंबईत मराठा आंदोलनात अडथळा; जेवणाची वाहने पोलिसांनी रोखली, माजी आमदार विक्रम सावंत आक्रमक
मुंबई : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आझाद मैदानावर सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाला महाराष्ट्रभरातून भक्कम पाठिंबा मिळत आहे. जत तालुक्यातील वाळेखिंडी गावातील दानशूरांनी उपोषणकर्त्यांसाठी मोठ्या प्रमाणावर खाद्यपदार्थ मुंबईला पाठवले.
हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!
मात्र, ही जेवण घेऊन जाणारी वाहने मुंबईतील अटल सेतूवर पोलिसांनी थांबवली. यावर माजी आमदार विक्रम सावंत आक्रमक पवित्र्यात आले व पोलिसांना थेट जाब विचारला. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेर वादानंतर पोलिसांनी वाहने सोडली.
यानंतर विक्रम सावंत आझाद मैदानावर दाखल झाले आणि मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला आपला पाठिंबा दर्शवला.
• नम्र निवेदन
“निर्भीड, नि:पक्ष, निस्पृह पत्रकारितेसाठी तुमचे सहकार्य गरजेचे आहे…”
लोकशाही मूल्यांची जपणूक, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची निष्ठा, आणि समाजजाणिवेची पायाभरणी हेच गौरव प्रकाशनचे ध्येय आहे. निर्भय, नि:पक्ष आणि लोकहितवादी पत्रकारिता हे आमचे बोधवाक्य आम्ही केवळ शब्दापुरते न ठेवता कृतीत उतरवत आहोत.
या सत्यशोधन आणि परिवर्तनाच्या प्रवासात तुमच्या आर्थिक सहकार्याची नितांत गरज आहे. आपले थोडेसे योगदान आमच्या निर्भय पत्रकारितेस बळ देऊ शकते. खालील QR कोड स्कॅन करून आपण आपल्या परीने मोलाचे सहकार्य करू शकता. चला, एकत्र येऊन समाजपरिवर्तनाच्या या वाटचालीत सहभागी होऊया. कारण खरी पत्रकारिता केवळ बातम्या देत नाही, तर भविष्यास आकार देते.
-बंडूकुमार धवणे
संपादक गौरव प्रकाशन
