मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांचा टोकाचा निर्णय; उद्यापासून पाणी पिणंही बंद
मुंबई : मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरू आहे. मागण्यांची अंमलबजावणी होत नसल्यामुळे आता त्यांनी आणखी कठोर भूमिका घेतली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी जाहीर केले की, “आजपर्यंत मी पाणी घेतले पण उद्यापासून पाणीही बंद करणार आहे. म्हणजेच उपोषण आणखी कडक स्वरूप धारण करेल.”
राज्यभरातून मोठ्या संख्येने मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. आंदोलकांना उद्देशून जरांगे पाटील म्हणाले, “मराठा समाजाला 70 वर्षांपासून आरक्षण मिळालेले नाही. गोरगरीब मराठा समाजाची वेदना मोठी आहे. ज्यांच्याकडे वाहनं आहेत त्यांनी गाड्या मैदानात लावा आणि रेल्वेने आझाद मैदानावर या, तुमच्या गाड्या सुरक्षित राहतील.”
सरकारकडून ठोस निर्णय न घेतल्यामुळे उद्यापासून आमरण उपोषण आणखी तीव्र होणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. त्यामुळे मराठा आरक्षण चळवळीची धग राज्यभर वाढण्याची शक्यता आहे.
हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!
• नम्र निवेदन
“निर्भीड, नि:पक्ष, निस्पृह पत्रकारितेसाठी तुमचे सहकार्य गरजेचे आहे…”
लोकशाही मूल्यांची जपणूक, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची निष्ठा, आणि समाजजाणिवेची पायाभरणी हेच गौरव प्रकाशनचे ध्येय आहे. निर्भय, नि:पक्ष आणि लोकहितवादी पत्रकारिता हे आमचे बोधवाक्य आम्ही केवळ शब्दापुरते न ठेवता कृतीत उतरवत आहोत.
या सत्यशोधन आणि परिवर्तनाच्या प्रवासात तुमच्या आर्थिक सहकार्याची नितांत गरज आहे. आपले थोडेसे योगदान आमच्या निर्भय पत्रकारितेस बळ देऊ शकते. खालील QR कोड स्कॅन करून आपण आपल्या परीने मोलाचे सहकार्य करू शकता. चला, एकत्र येऊन समाजपरिवर्तनाच्या या वाटचालीत सहभागी होऊया. कारण खरी पत्रकारिता केवळ बातम्या देत नाही, तर भविष्यास आकार देते.
-बंडूकुमार धवणे
संपादक गौरव प्रकाशन
