“कितीही प्रयत्न झाले तरी आंदोलनाची तीव्रता कमी होणार नाही – मनोज जरांगे; मराठा आरक्षणाच्या लढ्याचा जाज्वल्य इशारा”
मुंबई : मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून शासनाकडून कोणत्याही प्रकारचे प्रयत्न झाले तरी हे आंदोलन थांबणार नाही, अशी ठाम भूमिका मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी व्यक्त केली आहे.
जरांगे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, “मराठा समाजाच्या हक्काचा प्रश्न हा केवळ कायदेशीर लढाई नाही तर अस्तित्वाची लढाई आहे. शासन आमच्याशी चर्चा करतं, आश्वासनं देतं, पण प्रत्यक्ष कृती मात्र होत नाही. त्यामुळे समाजामध्ये प्रचंड असंतोष आहे. कितीही प्रयत्न करून हे आंदोलन कमी करण्याचा प्रयत्न झाला, तरी समाजाच्या भावनांचा उद्रेक रोखता येणार नाही.”
हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!
ते पुढे म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षणाशिवाय पर्याय नाही. या लढ्यात प्रत्येक गावागावातून तरुण, शेतकरी, महिला मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. “सरकारनं आता प्रामाणिक पावलं उचलली पाहिजेत, अन्यथा आंदोलनाची ज्वाला आणखी तीव्र होईल,” असा इशारा त्यांनी दिला.
दरम्यान, जरांगे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले हे आंदोलन राज्याच्या विविध भागात गती घेत असून शासनाला मोठ्या अडचणीत आणत आहे.
• नम्र निवेदन
“निर्भीड, नि:पक्ष, निस्पृह पत्रकारितेसाठी तुमचे सहकार्य गरजेचे आहे…”
लोकशाही मूल्यांची जपणूक, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची निष्ठा, आणि समाजजाणिवेची पायाभरणी हेच गौरव प्रकाशनचे ध्येय आहे. निर्भय, नि:पक्ष आणि लोकहितवादी पत्रकारिता हे आमचे बोधवाक्य आम्ही केवळ शब्दापुरते न ठेवता कृतीत उतरवत आहोत.
या सत्यशोधन आणि परिवर्तनाच्या प्रवासात तुमच्या आर्थिक सहकार्याची नितांत गरज आहे. आपले थोडेसे योगदान आमच्या निर्भय पत्रकारितेस बळ देऊ शकते. खालील QR कोड स्कॅन करून आपण आपल्या परीने मोलाचे सहकार्य करू शकता. चला, एकत्र येऊन समाजपरिवर्तनाच्या या वाटचालीत सहभागी होऊया. कारण खरी पत्रकारिता केवळ बातम्या देत नाही, तर भविष्यास आकार देते.
-बंडूकुमार धवणे
संपादक गौरव प्रकाशन
