साहित्यसूर्याला विनम्र अभिवादन.!

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram

साहित्यसूर्याला विनम्र अभिवादन.!

ज्यांच्या लेखणीने मराठी भाषेतील साहित्य सातासमुद्रापार अजरामर झाले. आपल्या झुंजार लेखणीने तळागाळातील कष्टकरी, शोषितांच्या व्यथा साहित्यातून मांडणाऱ्या जन नायकाचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगावी झाला. ते साहित्यसूर्य अण्णाभाऊ साठे होय. त्यांनी साहित्यातली सर्व प्रकार लिहिले आहेत. नवलाईची गोष्ट ही की, फक्त दिड दिवस शाळा शिकून वैश्विक,परिवर्तनवादी, सामाजिक, विचार आपल्या साहित्यातून व्यक्त केले.

खरे तर अण्णाभाऊ साठे एक जागतिक कीर्तीचे साहित्यिक होते. परंतु इथल्या व्यवस्थेमुळे उपेक्षितच राहिले. फकिरा, वारणेचा वाघ, वैजयंती, माकडीचा माळ, आवडी, माझा रशियाचा प्रवास यासारख्या अनेक कथा, कादंबर्‍या, पोवाडे, नाटके, प्रवासवर्णन अण्णाभाऊंनी मराठी साहित्याला, महाराष्ट्राला दिलेली अनमोल भेट आहे.अशा या महान साहित्यिकाचा मृत्यू 18 जुलै 1969 रोजी झाला. असा कोहिनूर हिरा पुन्हा होणे नाही. आतापर्यंत उपेक्षित, दुर्लक्षित राहिलेल्या या साहित्यसूर्याच्या कार्याचा, योगदानाचा सरकारने विचार करून त्यांचा भारतरत्न देऊन गौरव केला पाहिजे. स्मृतिदिनानिमित्त साहित्य सूर्याला कोटी कोटी प्रणाम!

हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदा

ज्यांच्या लेखणीने मराठी भाषेतील साहित्य सातासमुद्रापार अजरामर झाले. आपल्या झुंजार लेखणीने तळागाळातील कष्टकरी, शोषितांच्या व्यथा साहित्यातून मांडणाऱ्या जन नायकाचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगावी झाला. ते साहित्यसूर्य अण्णाभाऊ साठे होय. त्यांनी साहित्यातली सर्व प्रकार लिहिले आहेत. नवलाईची गोष्ट ही की, फक्त दिड दिवस शाळा शिकून वैश्विक,परिवर्तनवादी, सामाजिक, विचार आपल्या साहित्यातून व्यक्त केले.

हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!

खरे तर अण्णाभाऊ साठे एक जागतिक कीर्तीचे साहित्यिक होते. परंतु इथल्या व्यवस्थेमुळे उपेक्षितच राहिले. फकिरा, वारणेचा वाघ, वैजयंती, माकडीचा माळ, आवडी, माझा रशियाचा प्रवास यासारख्या अनेक कथा, कादंबर्‍या, पोवाडे, नाटके, प्रवासवर्णन अण्णाभाऊंनी मराठी साहित्याला, महाराष्ट्राला दिलेली अनमोल भेट आहे.अशा या महान साहित्यिकाचा मृत्यू 18 जुलै 1969 रोजी झाला. असा कोहिनूर हिरा पुन्हा होणे नाही. आतापर्यंत उपेक्षित, दुर्लक्षित राहिलेल्या या साहित्यसूर्याच्या कार्याचा, योगदानाचा सरकारने विचार करून त्यांचा भारतरत्न देऊन गौरव केला पाहिजे. स्मृतिदिनानिमित्त साहित्य सूर्याला कोटी कोटी प्रणाम!

अजय बनसोडे
मु.दापेगाव जि.लातूर