
नवी दिल्ली : वीस वर्षे जुनी गाडी रस्त्यावर ठेवण्यासाठी आता वाहनमालकांना काही महत्त्वाच्या अटी पाळाव्या लागणार आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने ठरवलेल्या नव्या नियमांनुसार 20 वर्षे पूर्ण केलेल्या वाहनांसाठी नोंदणी नूतनीकरण आणि फिटनेस टेस्ट अनिवार्य करण्यात आली आहे.
यासाठी वाहनमालकांना नेहमीपेक्षा दुप्पट शुल्क भरावे लागणार असून स्वतंत्र फिटनेस तपासणीही होणार आहे. इंजिन, ब्रेक, टायर, लाईट यासह वाहनाच्या प्रत्येक भागाची काटेकोर तपासणी केली जाणार आहे. तसेच प्रदूषण उत्सर्जन (PUC) निर्धारित निकषांनुसार आहे का हे तपासले जाणार आहे. फिटनेस प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच वाहन रस्त्यावर धावू शकेल.
हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!
खासगी वाहनांसाठी नोंदणी नूतनीकरणाचे शुल्क जास्त असणार आहे, तर व्यावसायिक वाहनांसाठी आणखी कडक अटी लागू होणार आहेत. शहरी भागात वाढत्या प्रदूषणामुळे हे नियम कडकपणे राबवले जातील. मात्र, ग्रामीण भागातील वाहनांना काही प्रमाणात दिलासा देण्यात येणार आहे. शेतीसाठी किंवा गावांतर्गत वापरासाठी असलेल्या वाहनांच्या नूतनीकरण शुल्कात सरकार थोडी शिथिलता दाखवणार आहे.
सरकारचा उद्देश एकीकडे प्रदूषण नियंत्रणावर लगाम घालणे आणि दुसरीकडे नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे हा आहे. कारण वाहनाचे वय वाढल्यास अपघाताचा धोका आणि दुरुस्ती खर्च मोठ्या प्रमाणात वाढतो. त्यामुळे नियमित तपासण्या करून गाडी रस्त्यावर सुरक्षित आहे याची खात्री करणे अत्यावश्यक आहे.
नवीन नियम लवकरच अंमलात येणार असून नोंदणी नूतनीकरण वेळेत न केल्यास दंडात्मक कारवाईही होऊ शकते. त्यामुळे वाहनमालकांनी आत्तापासूनच आपल्या गाडीच्या कागदपत्रांची तयारी करून ठेवणे गरजेचे ठरणार आहे.
- नम्र निवेदन
“निर्भीड, नि:पक्ष, निस्पृह पत्रकारितेसाठी तुमचे सहकार्य गरजेचे आहे…” लोकशाही मूल्यांची जपणूक, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची निष्ठा, आणि समाजजाणिवेची पायाभरणी हेच गौरव प्रकाशनचे ध्येय आहे. निर्भय, नि:पक्ष आणि लोकहितवादी पत्रकारिता हे आमचे बोधवाक्य आम्ही केवळ शब्दापुरते न ठेवता कृतीत उतरवत आहोत.
या सत्यशोधन आणि परिवर्तनाच्या प्रवासात तुमच्या आर्थिक सहकार्याची नितांत गरज आहे. आपले थोडेसे योगदान आमच्या निर्भय पत्रकारितेस बळ देऊ शकते. खालील QR कोड स्कॅन करून आपण आपल्या परीने मोलाचे सहकार्य करू शकता. चला, एकत्र येऊन समाजपरिवर्तनाच्या या वाटचालीत सहभागी होऊया. कारण खरी पत्रकारिता केवळ बातम्या देत नाही, तर भविष्यास आकार देते.
-बंडूकुमार धवणे
संपादक गौरव प्रकाशन

गाडी 20 वर्षांची झाली तरीही टेन्शन नाही….