Thursday, November 13

पोट कमी करायचेय?

Pot

लहान मुलांमध्ये अँलर्जीचे प्रमाण सध्या बरेच वाढतेय. ठराविक अन्नपदार्थांमुळे होणारे दुष्परिणाम हे यामागील महत्त्वाचे कारण आहे. दाणे, अंडी, गाईच्या दुधातून मिळणारी प्रथिनं आणि मासे या घटकांमुळे अँलर्जी होण्याची शक्यता असते. या अँलर्जीची वेगवेगळी लक्षणं दिसून येतात. अंगावर पुरळ उठणं, मळमळ, उलट्या, जुलाब यासारखी लक्षणं दिसून येतात. अँलर्जी असलेले अन्नपदार्थ टाळणं हा यावरील सर्वोत्तम उपाय मानला जातो. अनेक मुलांमध्ये प्रौढपणी ही समस्या दूर झालेली असते. पण अनेक माता आपल्या मुलांना असे पदार्थ देणं टाळतात. पण मुलांना लहान वयात हे पदार्थ खायला दिले तर अँलर्जीची समस्या दूर होऊ शकते, असं एका संशोधनातून समोर आलंय. अगदी तीन महिन्यांच्या बाळाला असे पदार्थ खायला दिल्यास अँलर्जीची समस्या मोठेपणी दूर होऊ शकते.

हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरज

या संशोधनात स्तनपानावर अवलंबून असलेल्या तीन महिन्यांच्या लहानग्यांचा समावेश होता. दोन गटांमध्ये त्यांची विभागणी करण्यात आली. पहिल्या गटातल्या मुलांना पुढच्या तीन महिन्यांपर्यंत स्तनपान देण्यात आलं तर दुसर्‍या गटातल्या मुलांची अँलर्जीविषयक चाचणी घेण्यात आली. या पदार्थांची अँलर्जी नसलेल्या मुलांना दही, दाणे, उकडलेली अंडी, तीळ असे पदार्थ देण्यात आले. या मुलांच्या आहारात गव्हाचा समावेश सर्वात शेवटी करण्यात आला. मुलं तीन वर्षांची होईपर्यंत त्यांचं निरिक्षण करण्यात आलं. पण या पदार्थांची अँलर्जी असलेल्या मुलांना त्याऐवजी इतर पदार्थ देण्यात आले. अँलर्जी असलेल्या मुलांना हे पदार्थ आयुष्याच्या पुर्वार्धात दिल्याने भविष्यातली त्यांची लक्षणं दूर झाली. अर्थात हे एक संशोधन असल्यानं तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या देखरेखीखाली सर्व चाचण्या पार पडल्या. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानं आणि मार्गदर्शनाखाली मुलांना आहार दिला गेला पाहिजे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेनं मुलांना सहा महिन्यांपर्यंत स्तनपान देण्याचा सल्ला दिलाय. सहा महिन्यांनंतरच त्यांना इतर प्रकारचा आहार द्यायला हवा.

पोटाची चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय

 

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणेबंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.

Leave a Reply