Wednesday, December 31

इंजिनिअरिंगनंतर डीआरडीओ

22

सध्या लष्कराच्या अत्याधुनिक करणावर तसंच शस्त्रसज्जतेवर दिला जात असलेला भर सर्वसामान्यांच्या नजरेतूनही सुटण्यासारखा नाही. भारतीय लष्कराला लागणारी शस्त्रास्त्रं तयार करण्याचं काम संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) या संस्थेतर्फे केलं जातं.

या संघटनेतर्फे अनेक प्रकारची क्षेपणास्त्रंही विकसित केली जातात. शिवाय सध्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून काही प्रगत देशांच्या सहकार्यानं भारतातच विविध अत्याधुनिक क्षेपणास्त्रांच्या निर्मितीवर भर दिला जात आहे. क्षेपणास्त्रांची निर्मिती आणि चाचणी या क्षेत्रात मेकॅनिकल आणि एरॉनॉटिकल इंजिनिअरिंगसारखा अभ्यासक्रम पूर्ण करुन बाहेर पडलेल्या पदवीधरांना उत्तम वेतनाच्या नोकर्‍या प्राप्त होऊ शकतात.

हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरज

या प्रयोगशाळांमध्ये विविध प्रकारच्या चाचण्या घेतल्या जातात. त्यात उत्तीर्ण झाल्याखेरीज क्षेपणास्त्रं लष्करात वापरली जात नाहीत. त्यामुळे क्षेपणास्त्र तयार करण्याची कच्ची सामुग्री मिळवण्यापासून तयार झाल्यानंतरच्या प्रत्येक पायरीवर परीक्षेला उतरलीच पाहिजेत असा कटाक्ष असतो. याकामी अनेक प्रकारचे तज्ज्ञ गुंतलेले असतात. त्यामुळेच इथे मोठय़ा संधी तुमची वाट पहात आहेत हे जाणून घ्या.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणेबंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.

Leave a Reply