- आठवण…..
- काय सांगू तुज आई
- येते आठवण किती? ।
- डोळ्यातून रक्त वाहे
- पाहताना चित्रफिती ।।
- खातो एकांत मनाला
- मन कुठेच रमेना ।
- आई शब्द उच्चारता
- तुझा चेहरा दिसेना ।।
- बिनकामी वाटे ज्ञान
- तुझ्या प्रेमापुढे आई ।
- आई शब्द रेखाटते
- माझ्या लेखणीची शाई ।।
- तुजविन गुरु मोठा
- मज कुठे मिळणार?
।
Contents
hide
- स्वप्नामध्ये आई नित्य
- फक्त तूच दिसणार ।।
- जन्म तुजमुळे झाला
- तुझ्यासाठी मरायचे ।
- झालो शहाणा कितीही
- नाही तुज भुलायचे ।।
- आई सोडून शाळेला
- यावे वाटते गावाला ।
- मज करायचे आहे
- स्पर्श तुझ्या चरणाला ।।
- शब्दसखा-
- अजय रमेश चव्हाण,
- तरनोळी, ता.दारव्हा,जि.यवतमाळ
- मो.८८०५८३६२०७