मयत पोलीस शिपाई संदीप चौधरी यांच्या परिवाराला दिली यशोमती ठाकूर यांनी सांत्वन भेट
मयत पोलीस शिपाई संदीप चौधरी यांच्या परिवाराला दिली यशोमती ठाकूर यांनी सांत्वन भेट
गौरव प्रकाशन
अमरावती ( प्रतिनिधी) : बंदोबस्तात असलेल्या पोलीस शिपायाचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या परिवाराची सांत्वन भेट घेत यशोमती ठाकूर यांनी कुटुंबातील सदस्यांना धीर दिला.
अमरावती ( प्रतिनिधी) : बंदोबस्तात असलेल्या पोलीस शिपायाचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या परिवाराची सांत्वन भेट घेत यशोमती ठाकूर यांनी कुटुंबातील सदस्यांना धीर दिला.
गुरुकुंज मोझरी येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेसाठी आलेल्या संदीप देविदास चौधरी या पोलीस शिपयाचा अपघाती मृत्यू झाला होता. चांदूरबाजार पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले संदीप चौधरी नोव्हेंबर रोजी योगी आदिनाथ यांच्या सभेच्या बंदोबस्त करिता गुरुकुंज मोझरी आले होते. आयोजकांच्या ढिसाळ कारभारामुळे मोठी गर्दी झाल्याने पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागली.यातच संदीप चौधरी यांचा बस खाली येऊन दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे चौधरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. या घटनेने एकाकी पडलेल्या चौधरी यांच्या पत्नी व मुलाबाळांची भेट घेऊन यशोमती ठाकूर यांनी त्यांचे सांत्वन केले.
चौधरी यांच्या पत्नी माहेरी गेल्यामुळे त्यांचे मार्डी येथील घरी जाऊन पत्नी व मुलांची तसेच नातेवाईकांची भेट घेऊन धीर दिला. अशा घटना घडत असतात . माझ्यासोबत ही अशी दुर्दैवी घटना घडली आहे. परंतु यामधून सावरून आपल्या मुलाबाळांचा विचार करत पुढे जायचं असतं. शासनातर्फे शक्य होईल ती मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करणार तसेच अनुकंपावर नोकरीसाठी देखील पाठपुरावा करू असे आश्वासन यावेळी यशोमती ठाकूर यांनी संदीप चौधरी यांच्या पत्नीला दिले. यावेळी चौधरी यांच्या नातविकासह गावातील नागरिकांची उपस्थिती होती.