थंगलान काय आहे ?
ही कथा आहे कोलार गोल्ड फील्डच्या ( KGF )
खाणीत सापडणार सोन,त्यात आम्हाला मिळणारा वाटा आमचं नशीब बदलेल,आमची पिढ्यानपिढ्याची पिडा,दुःख,शोषण संपवेल,आमची अस्पृश्यता नष्ट करेल,आम्हाला सामाजिक मानसन्मान मिळवून देईल,आम्हाला हिंदू धर्मातील वर्ण व जातीव्यवस्थेतून मुक्ती मिळवून देईल अशी आशा ठेवून पिढ्यानपिढ्यापासून उच्च वर्णीय,जातीय राजा,जमीनदार यांच्या नंतर ब्रिटिशांना सोन काढून देणारा,सोन काढण्यासाठी मदत करणारा अस्पृश्य दलित समूह व त्यांचा पराक्रमी,आशावादी नेता थंगलान तर
दुसरीकडे
स्वतःच्या पूर्वजांची पिढ्यानपिढ्यांची जमीन,त्यात आढळणार सोन,हिंदू धर्मातील वर्ण जातीव्यवस्थेच्या पलीकडे असणारी स्वतःची स्वतंत्र सामाजिक,सांस्कृतीक ओळख,व्यवस्था,विरासत,जीवनपद्धती या सर्वांचे निडरपणे प्रसंगी लढाई करून,स्वतःचे प्राण देऊन अथवा शत्रूचे प्राण घेऊन रक्षण करणारा मातृसत्ताक आदिवासी नागा समूह व या आदिवासी नागा समूहाची शुर पराक्रमी महीला नेता आरथी
असे हे वेगवेगळी धारणा,विचारधारा,उद्दिष्ट असलेले दोन समूह व या दोन समूहातील नेत्यांमध्ये पिढ्यानपिढ्यापासून चालू असलेल्या संघर्षाची.
पुढे या संघर्षांच नेमक काय होत ?
हा संघर्ष थांबतो का ?
की तसाच पुढे चालू राहतो ?
की आणखी नव काही होत ?
या सर्व प्रश्नांची उत्तर जाणून आणि समजून घेण्यासाठी तामिळ चित्रपट सृष्टीतील प्रखर आंबेडकरवादी दिग्दर्शक पा.रंजीत यांचा “थंगलान” हा चित्रपट प्रत्येक दलित व आदिवासी व्यक्तीने नक्की पहावा.