एक आंदोलन असं ही…
पोलीसाची आणि नामा तात्याचीच जुंपली….आणि एक आंदोलन उभं राहिलं.
कुणाचं कुठ जमलं आणि कोणाच कुठ बिनसलं. हे काहीच सांगता येत नाही. तस जमायला अनेक कारण लागतात परंतु बिनसायला एक कारण ही पुरेस असत नाही का?असच सरकार विरोधात एल्गार पुकारलेल्या नामा तात्याची कथा ही आणि व्यथा ही….!
नामातात्या “, हा अस्सल” गावरानगडी डोकयात पांढरी टोपी पायजमा आणि नेहरू शर्ट हाडाचा शेतकरी त्या मूळ वय साठी च्या आसपास पण शरीर मात्र आजच्या तिशीतील तरुणाला ही लाजवेल इतकं फिट्ट सावळा वर्ण आणि हसतमुख चेहरा असणारा “नामातात्या”,शेतमाल घेऊन वाशी मार्केटला आला.माल विकून तो आणि ड्रायव्हर आपलं पुन्हा गाव गाठण्यासाठी निघाले असता गाडी जोरात आदळत होती.गाडी आदळ ल्या मूळे रात्रभर जागा असलेल्या नामातात्याला लागलेली डुलकी मोडली तो जोरात पिकअप चालवणा ऱ्या मण्याकडे पहात म्हणाला.
“घरी दारी मन्या तुहय तेच कस र! आपल्या गावात समजून घेतो रस्त नीट नाय.पण ही ममई हाय इथं तर रस्त हेमामालिनी च्या गाला सारख मऊ मऊ हाय ! नीट चालव जरा! का आदाळीतो.
आता मन्या बारा गावच पाणी पेलेला असल्याने तो बोलला सप्नात आली कायनू तात्या तुमच्या हेमामालिनी.डोळ झाकल्याव हेमामालिनी दिसती जरा डोळ उघड करून पहा बर! रस्त्याव खड्ड किती हे ते. हे का इमान हे का न हलता चालायला.
तर तर नको बाता मारू मना जसा तू ईवायनात बसलाय. अस सांगतोय मला.ह्यांच्या गप्पा चालू असताना सिग्नल मन्या कडून तुटला.तिथं उभ्या असलेल्या हवालदाराने जोरात शिट्टी मारत गाडी बाजूला घे म्हणून आवाज दिला.मन्या ने ही गाडी बाजूला घेतली आणि खाली उतरला.तोवर हवालदार गाडीच्या नंबर प्लेट चे फोटो काढून घेऊ लागला. नामा तात्या मनात हसत होता. ह्य पोलसाड काय याड हे काय कायनू ! मागून काह्याला फोटु कढीतय. अस मनात तो विचार करू लागला.
“मन्या, हवालदाराची विनवणी करतोय हे पहाताच, तात्या ही खाली उतरला.काय झालं साहयब ? आव सोडा की ! एक तर रात भर झोप नाय! अस म्हणत तात्या ने विनवणी केली. तो हवालदार बोलला सिग्नल तोडलाय तुम्ही, हा तिच्या माणुस तर नाय ना तोडला.अस म्हणत नामा तात्या हसला. मन्या मात्र गयावया करत शंभर देऊन सुटण्यासाठी प्रयत्न करत होता.
“,हवालदार कड पहात आव घ्या की फुल ना फुलांची पाकळी आम्ही आपलं बोलत व्हतो. त्याला नाय दिसला खड्डा .झाली चूक अस म्हणत तात्या विनवणी करत होता. पण हवालदार काही ऐकत नाही अस दिसताच तात्या ची सटकली.
गाडीच फोटू काढलं नव्ह आता ह्या रस्त्याच् फोटू काढ. त्या खड्याच फोटू काढ.अस एकरे भाषेत जोर जोरात तात्या त्या हवालदाराला बोलू लागला तशी गर्दी ही जमू लागली. मग काय तात्या आणि जोमात. मन्या तू बी काड् त्या खड्याच फोटू.तुही गाडी आढळून काय तुटल त्याचा फोटू काढ
पोलिसांकड पहात मन्या आता बोलू लागला.
नियम फक्त फक्त आम्हांसनी , रस्ता नीट द्यायचं काम कुणाचं हाय! कर घेता नव्ह . ह्या रस्त्या च्या खड्या पायी दरवर्षी किती तरी माणस मर्त्यांत ! त्याची जबाबदारी कोण घेणार? मुख्यमंत्री की उपमुख्यमंत्री!?गर्दी प्रचंड वाढली होती.गर्दीच रूपांतर अचानक आंदोलनात झालं होतं.सरकार विरोधी घोषणाबाजी जोर जोरात सुरू होती.तात्या त्या आंदोलनाचा चेहरा बनला होता.
मित्रानो गरज आहे ती पेटून उठण्याची फुकट देत सुटलेल्या सरकारला जाब विचारलं पाहिजे. राजकिय पक्ष हे सत्ते साठी फुकट खैरात वाटतील विरोध करन हे आपलं काम आहे . हा पैसा विकास कामावर खर्च व्हावा इतकंच……..
अशोक पवार