मताची झाली कडकी..
मताची झाली कडकी..
म्हणून बहिण झाली लाडकी..
भाचा होऊन पदवीधर
त्याला म्हणतोस भजे तळ..
दाजी गाळतो शेतात घाम..
त्याच्या सोयाबीनला नाही दाम
नव हजारा वरून भाव तिन हजारावर आणले
दाजी च्या खिशातले 6000 हाणले…
त्या मधले 1500 माझ्या हातावर ठेवले..
कळले मला तुझे फसवे डावपेच..
शाळेत, दवाखान्यात सुरक्षित नाही माझी लेक..
सांगते तुला ठणकावून भिक नको मला..
“बदलापुरात” न जाता यवतमाळात..
कशाला आला..!
गोड आणि खोटं बोलून फसवतोस बहिणीला
पण तुझं कपटी शकुनी सारखं रूप,
कळलं मला आणि साऱ्या जगाला..!
– शोभा पारधी डाखोरे
वि.उपाध्यक्ष
जिजाऊ ब्रिगेड यवतमाळ.