ग्राहकांनी घेतला भारतीय डाक विभागाचे विमा कवच
गौरव प्रकाशन
अमरावती, (प्रतिनिधी) : भारतीय डाक विभाग अमरावतीमार्फत दि. 31 ऑक्टोबर 2023 रोजी ‘डाक जीवन विमा आणि ग्रामीण डाक जीवन विमा महा मेळावा’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन नागपुर रिजनचे पोस्ट मास्टर जनरल शोभा मधाळे यांचे हस्ते करण्यात आले.
टपाल जीवन विमा हा भारतील सर्वात जुना विमा असून, महिलांना विमा सुरक्षिततेची हमी देणारा भारतातील पहिला विभाग म्हणजे भारतीय डाक विभाग. भारतीय डाक विम्याची सुरवात भारतात 1 फेब्रुवारी 1884 साली झाली आणि आज भारतीय डाक विभाग वेगवेगळ्या विमा योजना राबवित आहे. त्यामध्ये प्रामुख्याने टपाल जीवन विमा व ग्रामीण टपाल जीवन विमा (PLI/RPLI) ह्या दोन योजना आहेत. पूर्वी टपाल विमा योजना ही केवळ शासकीय किंवा निमशासकीय कर्मचारी, बँक व इतर शासकीय अखत्यारीतील कर्मचारी वर्गासाठी उपलब्ध होती, परंतु शासनाने मागील वर्षापासून पदवी व पदविका धारक नागरिकांना ही सुविधा सुरू केली. त्यामुळे आता जास्तीत-जास्त नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. डाक जीवन विमाच वैशिष्ट म्हणजे कमी मासिक हप्ता व जास्त बोनस असा आहे.