नायलॉन मांजाचा ठरतोय फास.!
नायलॉन मांजाचा ठरतोय फास.!निर्बंधाकडे दुर्लक्ष करून मांजा विकणे अयोग्य'चढा ओढीत चढवीत होते..बाई मी पतंग उडवीत होते..'आई मी पतंग उडवीत होते. ही लावणी ऐकताना आपण मंत्रमुक्त होतो मात्र हाच मंत्रमुक्तपणा मुक्या पक्षांच्या प्राण्यांच्या तसेच मनुष्याच्या गळ्याचा फास होतो,याचा विचार कोणीच करताना दिसत नाही प्रत्यक्षात पतंग उडविण्याचा आनंद साध्या मांज्याने घ्यावा असे असतानाही सर्व विभागांच्या नाकावर टिच्चून चिनी नायलॉन मांजाची खुलेआम विक्री होत आहे. यातूनच पक्षी तसेच वाहन चालक जखमी होत असल्याच्या घटना घडत आहेत.नायलॉनच्या मांजामुळे गळा कापल्याने दर वर्षी लोक गंभीर जखमी होतात; तर शेकडो पक्ष्यांचा मृत्यू होतो आहे. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) नायलॉन मांजावर चार वर्षांपूर्वीच बंदी घातली आहे. औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशांमध्ये पुन्हा एकदा नायलॉन मांजांवरील बंदी कायम केली आहे. मात्र, स...
