दिवाई…
दिवाई...दोन दिवसावर दिवाई येऊन ठेपली होती.बजारहाटेत लोकाची सामानसुमान खरेदीसाठी करण्यासाठी निरानाम गर्दी ही गर्दी दिसायची.सणासुदीच्या दिवसात कित्येकांच्या घरादाराची सुरू असलेली साफसफाई व रंगरंगोटी संपत आली होती. कपडेलत्ते,फळे,फटाखे,फरायाची दूकाने मस्त सजली होती. प्रत्येकाच्या चेहरयावर सणासुदीचा आनंद झळकत होता.लहानापासून तर मोठया पर्यत सारीच दिवाईच्या सणानं कामाले लागली होती.यशोदीलेही अजून चारपाच घरची धुणीभांडी करायची होती.मोठया लगबगीने ती कामासाठी पायटीच निघाली होती.सपासप पावल टाकत अंतर कापत होती.डोकं मात्र विचारान सुन्न झालं होतं. झाकटीतच उठल्या पासून नीरा नुसती धावाधावच तीच्या पाचवीला पुजली होती.कामानं तीचं सार आंग आंबून गेल होत.कामान आलेला थकवा तीच्या हाडकुळया ,निस्तेज चेहऱ्यावर व क्षीण झालेल्या देहावर क्षणोक्षणी जाणवत होता.कुपोषणाने शरीर गलीतगात्र झालेलं, नेहमी एकच मळकट साडी, मध्...
