महानायक : वसंतराव नाईक
महानायक : वसंतराव नाईकज्या समाजाला इंग्रजाच्याच्या काळात एका ठिकाणी फार काळ थांबता येत नव्हतं. ज्या समाजात अंधश्रधा,वाईट रुढी,परंपरा यांचं साम्राज्य होतं.ज्या समाजात काला अक्षर भैंस बराबर होतं.पोटासाठी रानोमाळ भटकणारा समाज. कपाळावर चोर गुन्हेगार म्हणुन ठसा उमटवलेला समाज.ना नावाची ना गावाची ओळख असेलला समाज.नातलगांची एकदा ताटातूट झाली तर पुन्हा भेट होईल की नाही याची खात्री नसलेला समाज.त्यासाठी एकमेकांच्या गळ्यात पडून गाण्यातून रडणारा समाज म्हणजे गोरमाटी (बंजारा) समाज.
शांततेच प्रतिक म्हणून पांढरा ध्वज स्विकारुन शांततेच्या काळात ,लढाईच्या काळात राजा महाराजांना धान्यांची रसद पुरविणारा गोरमाटी समाज तेवढाच शूर विर आहे.यांच्याकडे आदरातिथ्य आहे.दुसऱ्यांना सन्माने वागवण्याची वृत्ती आहे.दिलेला शब्द पाळण्याची वृत्ती यांच्या नसानसात भिनलेली आहे ;पण समोरचा जर विश्वासघातकी निघाला तर त्याला तोडण्याची ह...
