शिवार माया
Contents
hide
शेतावर पिकला
पिवळा जोंधळा
कणसं मोत्यांची
आलिंगन आभाळा …!
ज्वारीच्या ताटावं
पेललं आभाळ
किरण सुर्याची कवळी
देती कणसाला बळ …!
मध्येच डोकावतो
अल्लड पाखरांचा थवा
गर्द झाडीत लपला
रान फळांचा मेवा …!
दुर दिशेला खुणावतो
महा डोंगर निळा
तिथं वहाळापल्याड
खेळ म्हणतो बाळा ….!
बांधावर बोरीची लय
पिकलेत बोरं
गाभूळलेल्या चिंचेनं
दावला आपलाच उर …!
दमून-धुपून चार गायी
आल्या पाण्यावर
बेभान वासरांसंगे
खेळू लागली पोरं ….!
तानाजी धरणे
9975370912