चंद्रपूर चे कवी श्री.एम.ए.रहीम यांना साहित्य उपासक पुरस्कार प्रदान
गौरव प्रकाशन अमरावती (प्रतिनिधी) : प्रज्ञा बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र आयोजित ११ वे राज्यव्यापी मराठी साहित्य संमेलन दि 17 नोव्हेंबर २०२४ रोजी हाॅटेल मोदी ग्रॅंड,संभाजीनगर येथे दिमाखात पार पडले.
कार्यक्रमाचे उद्घाटक श्री.किशोरकुमार मिश्रा शेगाव यांनी दिप प्रज्वलन करून केली, प्रमुख अतिथी श्री.हबीब भंडारे संभाजीनगर होते व अध्यक्षस्थान गझलकार व कवी ‘मकरंद घाणेकर पुणे यांनी भूषविले,सुत्रसंचालन आपल्या सुमधुर शैलीत सौ.वंदनाताई घाणेकर पुणे आणि डॉ.चंदना लोखंडे वीटा यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रज्ञा मंचच्या अध्यक्षा लीनाताई देगलूरकर यांना ‘ माउली ‘ हा सन्मान देऊन झाली. तसेच त्यांचा गझल संग्रह ‘अनुराग’ या वेळी प्रकाशित झाला.
या कार्यक्रमात विविध मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. चंद्रपूर चे कवी श्री.एम.ए.रहीम यांना साहित्य उपासक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सकाळच्या पुरस्कार सत्रानंतर गझल मुशायरा आयोजित केला होता. याचे अध्यक्षस्थान गझलकार शरदचंद्र पाटील पुणे यांनी भूषवले तर सुत्रसंचालनाची जबाबदारी कवी व गझलकार श्री.अंबादास ठाकुर पुणे यांनी सांभाळली.
कविसंमेलनाचे अध्यक्ष श्री अनिलकुमार कुलकर्णी देगलूर होते.
संमेलनात उत्कृष्ठ कविता व गझल ऐकायला मिळाल्या. लीनाताई देगलूरकर यांच्या प्रेमा भोवती गुंफलेला हा आनंद सोहळा अतिशय उत्साहाने संपन्न झाला. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजक डॉ. शैलेंद्र भणगे संभाजीनगर यांनी उत्तम आयोजन केले. या संस्थेचे पुढील संमेलन फेब्रुवारी अथवा मार्च मध्ये घेण्याचा निर्णय संस्थेच्या पदाधिका-यांनी कळवला आहे.