निवडणूक निकाल चिंतन…!
जनमताचा आवाका व खोली ज्ञात नसलेल्या लोकांकडून ईव्हीएम वर घेतलेली शंका समजू शकते. परंतु बुद्धिवादी लोकांनी जनमतावरील वाढलेल्या प्रभावांचे विश्लेषण न करता भुई आपटून घेण्यात काय अर्थ आहे ?
महाविकास आघाडीने तर सर्व डाव्या पक्षांना बेदखल करून त्यांचा कधी नव्हे इतका अवमान केला आहे. याचा राग येण्याऐवजी शत्रू हरल्याच्या दुःखाने विचारवंत रडत आहेत, याचे आश्चर्य वाटते. वास्तविक, प्रस्थापित शक्तींचा ‘न भूतो न भविष्याति’ असा पराभव झाल्यामुळे डाव्या विचारांच्या शक्तीला स्पेस निर्माण झाला याचा आनंद व्हायला हवा !
पुरोगामी विचारवंतांनी बदलेल्या राजकीय परिस्थितीचा लाभ कसा घेता येईल याचे सखोल चिंतन करून वाटचाल केल्यास डाव्या शक्तींना निश्चितपणे ऊर्जितावस्था येईल याची कधी नव्हे इतकी शक्यता निर्माण झालेली आहे…!
रडायची नव्हे तर आता खरी लढायची वेळ आली आहे, भान यावे ही नम्र अपेक्षा..!
– ॲड संदेश पवार