रक्षाबंधन
रक्षाबंधनाच्या ।
हार्दिक शुभेच्छा ।
मनस्वी सदिच्छा ।
सर्वांनाच ॥ १ ॥
बहिणीची राखी ।
पौर्णिमेच्या दिनी ।
आनंदाची गाणी ।
सुखमय ॥ २ ॥
नाते असे घट्ट ।
भाऊ असे छाया ।
ताईचीही माया ।
असे थोर ॥ ३ ॥
ताईच्या सुखाचे ।
भाऊ गाते गीत ।
होई वृद्धिंगत ।
बंधुभाव ॥ ४ ॥
रक्षाबंधनाला ।
ताईचे बंधन ।
करील रक्षण ।
भाऊराया ॥ ५ ॥
– प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,
(समाज भूषण पुरस्कार प्राप्त अभंगकार)
रुक्मिणी नगर,अमरावती.
भ्रमणध्वनी : ८०८७७४८६०८