युवा महाराष्ट्र साहित्य भुषण पुरस्काराने कवी आत्माराम गोविंदराव हारे सन्मानित
गौरव प्रकाशन
तळेगाव दाभाडे (प्रतिनिधी) : दि. २४ नोव्हेंबर रविवार रोजी
” नशा दारुची नको ,कवितेची करा ” अशी विचारसरणी घेऊन पिंपळे गुरव येथील कवी आत्माराम गोविंदराव हारे यांनी केवळ कवितेच्या माध्यमातून कार्य करत आले आहेत.
सुविचारांची चळवळ समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहचवण्याची ताकद कवींच्या प्रत्येक शब्दात असते म्हणूनच जो न देखे रवी ,तो देखे कवी या विचारांमुळे कवितेची उंची आणि खोली आयुष्याला अधिक सुंदर बनवण्यास कारणीभूत असते, समाजात चांगल्या गोष्टी रुजविण्यासाठी परिवर्तन घडवण्याची क्षमता फक्त नि फक्त कवितेत असते म्हणूनच खिशात दमडी नसतानाही कवितेत रमणारा हा अवलिया म्हणतो,
कविता म्हणजे माझा ऑक्सिजन आहे
माझ्यासाठी प्रत्येक कवीचा शब्द म्हणजे
ईश्वराने घालून दिलेली सुंदर भेट आहे…
अशी विचारसरणी घेऊन काव्य क्षेत्रात काव्यात्मा साहित्य परिषद पुणे चे संस्थापक अध्यक्ष कवी आत्माराम गोविंदराव हारे यांनी आजवर साहित्य क्षेत्रात केलेल्या कामाची दखल घेऊन मावळ तालुक्यात कार्यरत असणारी संस्था युवा प्रबोधन साहित्य म़ंच ,मावळ चे संस्थापक अध्यक्ष सागरभाऊ वाघमारे आणि त्यांचे कार्यकर्ते यांनी द्वितीय वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात कवी आत्माराम गोविंदराव हारे यांना युवा महाराष्ट्र साहित्य भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.सर्व स्तरातून कवी आत्माराम हारे यांचे कौतुक होत आहे.