राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या 56 व्या पुण्यतीथिती निमित्य स्पर्धेचे आयोजन
बंडूकुमार धवणे, संपादक
October 9, 2024
1 min read
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या 56 व्या पुण्यतीथिती निमित्य स्पर्धेचे आयोजन
गुरुकुंज मोझरी (प्रतिनिधी) : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाच्या 56 व्या पुण्यतीथी महोत्सवा निमित्य गुरुकुंज आश्रम येथे राष्ट्रीय सेवा योजना व श्रीगुरूदेव आयुर्वेद महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आंतर महाविद्यालीयन वक्तृत्व स्पर्धेचे भव्य आयोजन 16 आक्टोंबर रोजी सकाळी 10 ते 5 यावेळेत करण्यात आले आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे संघटन शक्ति विषयक विचार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे ग्रामशुध्दि विषयक विचार व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची सणोत्सवाची संकल्पना असे तिन विषय स्पर्धेसाठी ठेवण्यात आले आहे. स्पर्धेतील प्रथम विजेत्याला स्व इंदुताई अजाबराव देशमुख यांच्या स्मरणार्थ 10001 रुपयांचे नगद पारितोषीक,स्व शांताबाई शामरावजी बोबडे यांच्या स्मरणार्थ 5001 रुपयांचे द्वितीय पारीतोषीक,डॉ स्व अनिल गंधे यांच्या स्मरणार्थ 4001 रुपयांचे तृतीय पारीतोषीक,स्व रमेश लकडे यांच्या स्मरणार्थ 2501 रुपयांचे चतुर्थ पारीतोषीक व ॲड अशोक कोठारी यांच्या तर्फे 1501 रुपयांचे पाचवे पारीतोषीक व डॉ जयस्वाल यांच्या तर्फ ग्रामगीता भेट देण्यात येणार आहे.
ज्या स्पर्धकांना वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घ्यायचा असेल त्यांनी आपले आवेदनपत्र आपल्या महाविद्यालयाच्या वतीने sgayuc@gmail.com किंवा 7588574019 व्हॉटॲपवर पाठवावी व अधीक माहितीसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधीकारी डॉ लक्ष्मीकांत पायमल्ले यांच्या 7588574019 या भ्रमणध्वनीवर संपर्क करावा असे आवाहन श्रीगुरुदेव आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मुरलीधर खारोडे यांनी केले आहे.अखील भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे आरोग्य विश्वस्त डॉ पी.पी.पाळेकर यांच्या मागदर्शनात वक्तृत्व स्पर्धेचे नियोजन पुर्ण झाले आहे.