नवरात्रौत्सव ‘स्त्री शक्तीचा जागर’ राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेचा निकाल संपन्न
गौरव प्रकाशन अमरावती (प्रतिनिधी) : काव्यप्रेमी शिक्षक मंच नागपूर जिल्हा आयोजित “स्त्री शक्तीचा जागर” 3 ऑक्टोंबर ते 11 ऑक्टोंबर या नऊ दिवसीय राज्यस्तरीय ऑनलाईन काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन हे देशातील महान कर्तृत्ववान महिलांच्या कार्य कर्तृत्वाचा जागर व्हावा. त्यांचे कार्य अभ्यासले जावे! या उद्देशाने जिल्हा अध्यक्षा निशा खापरे यांनी केलेले होते.
नागपूर जिल्हा कार्यकारिणी अपर्णा कल्लावार, अर्चना कोहळे, कोकिळा खोदनकर, सुचिता कुनघटकर, उषा राऊत आणि रेखा सोनारे यांनी या स्पर्धेच्या यशस्वितेसाठी सहकार्य केले. स्पर्धेचे अनुक्रमे विषय समाजसेविका फातिमा शेख, पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे, भगिनी निवेदिता, बसंती देवी, अरुणा रॉय, मेधा पाटकर,सुनीता नारायण, मदर टेरेसा हे असून, या स्पर्धेचे हे चवथे वर्ष आहे. याही वर्षी स्पर्धकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. स्पर्धेचे अनुक्रमे परीक्षक डॉ. शोभा गायकवाड, अर्चना मुरुगकर, मुग्धा कुळये, दीप्ती यादव, मनिषा पाटील, मंजुषा कऊटकर, अॅड डॉ. नीता कचवे आणि प्रमोद भागवत यांनी स्पर्धा कवितांचे परीक्षण करून सहकार्य केले. या नऊ दिवसीय स्पर्धेचे विजेते ठरलेले स्पर्धक श्रीमती माणिक नागावे, वत्सला पवार पाटील, वर्षा तुपे, लीलाधर दवंडे, वर्ष भांदर्गे, डॉ. मनिषा नागरगोजे, आलिया गोहर जाकीर शेख, शब्दस्वरा मंगरुळकर, छाया शहाणे, रझिया जमादार, रेखा सोनारे, वसुधा निकम, सुनंदा अमृतकर, अंजली वारकरी, मंगला भोयर, जगदीश्वर मुनघाटे, कुशल गो डरंगे, शालिनी बेलसरे, रेखा जेगरकर, स्मिता भीमनवार, विद्या निनावे, विद्या टोंगसे, संगीता धनवटे, माधुरी फालक, पुरुषोत्तम रेखाते, सरोज गाजरे, सपना सावंत, रुपाली निखारे, अंजली वाघचौरे, किशोरी पाटील, श्रीगणेश शेंडे, संध्याराणी कोल्हे, राजेश चौधरी, डॉ. शुभांगी पाटील, सारिका सोनेजे, बी एन पाटील, कांचनदत्त पाटील, अनुराधा उपासे, योगिता निपाणे, छाया कुकडे, लोपामुद्रा शहारे, अलका रमेश ढवळे, शितल ढगे, वीणा बाविस्कर, डॉ. शील बागडे,संगीता माने, प्रमोद भागवत, कल्पना लांडे, हरिदा गौतम आहे.
निकाल जाहीर झाल्यानंतर या सर्व विजेते स्पर्धकांचे अभिनंदन करून समूहाचे संस्थापक आनंद घोडके, कालिदास चवडेकर, दीपक सपकाळ आणि नागपूर विभागीय अध्यक्षा कविता कठाणे यांनी या अभ्यासात्मक आणि आगळ्या वेगळ्या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या.