माये बैलं…
पेरे पावतर थकत नाई
चाऱ्यासाठी झुरत नाई
माये बैलं माया साठी
देवा परीस कमी नाई
ऊन असो,पाऊस असो
आंग भरलं हीव असो
सेवा सदायी देत रायते
बायने कवाच सांगत नाई
कास्तकाराचा खरा सोबती
हाव कोनतीच धरत नाई
गवानीतल्या कुटाराले
नांव कवाच ठुवत नाई
तोंडाले जरी आला फेस
अंधामंधात थांबत नाई
घाबरु नोको मनते मले
साथ तुयी सोळ्नार नाई
माये बैलं माया साठी
देवा परीस कमी नाई
–आबासाहेब कडू,
अमरावती
(९५११८४५८३७)
सर्वायले बैल पोळा सनाच्या वावरभर शुभेच्छा…!