‘जागर मायमराठीचा’ कविसंमेलन नागपुरात
गौरव प्रकाशन नागपूर (प्रतिनिधी) : चारोळी मंच, पुणे शाखा नागपूर व अक्षरक्रांती फाऊंडेशन, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, १७ नोव्हेंबर २०२४ ला सकाळी १० वाजता टिळक मराठी पत्रकार भवन, नागपूर येथे ‘जागर मायमराठीचा’ हे राज्यस्तरीय कविसंमेलन संपन्न होत आहे.
नागपूरचे सुप्रसिद्ध साहित्यिक व समीक्षक मा. प्रभाकर तांडेकर ‘प्रदत्त’ हे कविसंमेलनाचे उद्घाटक असून पुण्याचे सुप्रसिद्ध साहित्यिक मा. चंद्रकांतदादा वानखेडे हे कविसंमेलनाला अध्यक्ष म्हणून हजर राहतील, तर सुप्रसिद्ध कवी व गीतकार मा. गुलाबराजा फुलमाळी, पुणे हे प्रमुख अतिथी असतील.
चारोळी मंच, पुणेचे संस्थापक अध्यक्ष मा. तुकाराम कांबळे, कार्यकारी अध्यक्ष मा. विनायक चिखलीकर, अक्षरक्रांती फाऊंडेशनचे अध्यक्ष मा. शंकर घोरसे आणि समाजसेविका श्रीमती अरुणा सोनी, नागपूर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कविसंमेलनाला पुणे, नागपूर, अकोला, अमरावती, बल्लारपूर, वर्धा, कोल्हापूर, वाशिम, चंद्रपूर, भंडारा, बुलढाणा व इतर भागातून एकूण ५२ कवी/कवयित्री सहभागी होतील. हे कविसंमेलन दोन सत्रात होणार आहे. यात कवी मोहन सोमलकर व राहूल गवस यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे.
या कवीसंमेलनाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध हास्यकवी मा. राजेश माहूरकर व हितेश गोमासे करणार असून कवी विजय वासाडे हे आभार व्यक्त करतील.