स्वातंत्र्याचा महोत्सव
भगतसिंग, राजगुरू , सुखदेव
आठवू त्यांच्या बलिदानाला
सुभाषचंद्र ,झाशीची राणी अन्
चंद्रशेखर आझादच्या शौर्याला
स्वराज्य माझा जन्म अधिकार
स्मरूनी टिळकांच्या घोषणेला
महात्मा गांधीचे कार्यही सांगू
वंदन करूनी तिरंगी झेंड्याला
भारत माझा देश असा हा
देशाचा सार्थ आम्हा अभिमान
प्रत्येकाच्या मनात असावी
देशभक्ती आणि स्वाभिमान
चला संकल्प करूया मनामध्ये
जसा असावा सण आणि उत्सव
स्वातंत्र्य दिनी साजरा करूया
असा हा स्वातंत्र्याचा महोत्सव.
– अजय बनसोडे
मु.दापेगाव ता.औसा जि.लातूर