पिंपळखुटा येथे संविधान दिन कार्यक्रम संपन्न
गौरव प्रकाशन अमरावती (प्रतिनिधी) : श्रीसंत शंकर महाराज कला व वाणिज्य महाविद्यालय पिंपळखुटा ता.धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती येथे राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारे दि २६ नोव्हेंबर २०२४ रोजी भारतीय संविधान दिनाचा अमृतमहोत्सवी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.नरेश शं.इंगळे तर प्रमुख पाहुणे म्हणून वाणीभुषण हभप कुंजबिहारी महाराज धनजकर कामरगाव, श्री नितिन दांगट पुणे,श्री राजेंद्र उईके आर्वी,श्री बाळासाहेब गावंडे अमरावती आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरानी संविधानाची जडणघडण व संविधानाचे महत्त्व याबाबतीत सविस्तर असे मार्गदर्शन केले तसेच रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.नरेश शं. इंगळे यांनी भारतीय संविधान उद्देशिका वाचन केले व उपस्थितीताना शपथ दिली.
यानिमित्ताने गावातून संविधान जनजागृती रॅली, प्रश्नमंजुषा सह विविध कार्यक्रम आयोजित केले होते.कार्यक्रमाला ज्ञानेश्वर उके,ओमप्रकाश इंगोले सह सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी व मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.