बळी राजाचा सोबती
बळी राजाचा सोबती
राबे हिरव्या रानात
खांद शेकण्या नंदीचे
येई पोळा श्रावणात
सोनं बैलाच्या कष्टाचं
उगवते मातीतून
राजा भरते ओंजळ
बैलसखा सोबतीनं
माती चिखल तुडवी
वाही खांद्यावर भार
मालकाचा पाठीराखा
निष्ठावंत साथीदार
शेतीवाडीच्या कामात
असे जीवाचा आधार
त्याच्या कष्ट सोबतीने
मिळे पोटाला भाकर
सण संस्कृतीचा पोळा
जपे बळी मनातून
देई पुरणाचा घास
करी नंदीचे पूजन
आज दिवस सोन्याचा
आहे नंदीच्या मानाचा
ऋण फेडण्या बैलाचे
सण साजरा पोळ्याचा
– सौ निशा खापरे
नागपूर
7057075745