बुद्ध..!
रक्त सांडवणाऱ्या
अंगुलीमहालाला
नवे जीवनदान देणारा
बुद्ध..!!
माणसाच्या हृदयात
माणुसकीचा
मूल्यजागर करणारा
बुद्ध..!!
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या
जीवनाचे तत्त्वज्ञान बनलेला
बुद्ध…!!
जग बदलवण्याचा
क्रांतीचा उद्घोषक
बुद्ध… !!
माणसाच्या अत्तदीपत्वाचा
प्रकाशपुंज
बुद्ध …!!
मनामनात मैत्रीचा
अभ्यासक्रम निर्माणारा
बुद्ध..!!
काळोखाच्या छाताडावर
सूर्यदीप्त किरणोत्सव
बुद्ध…!!
जगण्याचे नवे
बळ देणारा ज्ञानमार्ग
बुद्ध..!!
– संदीप गायकवाड
नागपूर
9637357400