अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे जेष्ठ प्रचारक बळवंत येरपुडे यांचे निधन
गौरव प्रकाशन
Latest Marathi News : गुरुकुंज मोझरी (प्रतिनिधी) : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे सहकारी बळवंत येरपुडे यांचे वयाच्या 85 व्यावर्षी आज निधन झाले.
10 वर्ष ते रामटेक नगरपरिषदेचे नगराध्यक्ष होते.माजी पंतप्रधान नरशिंमहा राव यांच्यासोबत त्यांचे निकटचे संबंध होते.निवड मंडळाचे अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिले.गुरुदेव विद्यामंदिरात काही काळ शिक्षक म्हणून त्यांनी नोकरी केली होती. श्रीगुरुदेव प्रकाशन विभाग प्रमुख असतांना त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्याचा प्रसार व प्रचार व्यापक प्रमाणात केला.
ते गेल्या काही वर्षापासून गुरुकुंज आश्रमात वास्तव्य करीत होते त्यांच्या पार्थिव देहावर अंतिम संस्कार रामटेक येथे होणार आहे त्यांच्या निधनामुळे गुरुदेव परिवारात शोकमग्न वातावरण आहे.