व-हाडी कवी प्रशांत दामले यांची रुपेरी पडद्यावर झेप
हास्य कलागुणांमुळे त्यांची चित्रपटात निवड
सुनील शिरपुरे/यवतमाळ : अमरावती जिल्ह्यातील पिंपळोद या खेडेगावात वास्तव्यास असलेले व-हाडी हास्य कवी प्रशांत दामले यांची ” शिक्षण महर्षी भाऊसाहेब देशमुख” या मराठी चित्रपटात निवड करण्यात आली आहे.
संस्कृतीचा वारसा समोर नेत शालेय जीवनातील विद्यार्थी तणावमुक्त असावा यासाठी वऱ्हाडी कवितेच्या माध्यमातून जनजागृती करणारे प्रशांत दामले यांनी महाराष्ट्रामध्ये चांगलीच ओळख निर्माण केलेली आहे. सामान्य कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी “कला फाउंडेशन” नावाची संस्था सुरू करून कवी, लेखक व कलावंतांना हक्काचे व्यासपीठ त्यांनी उपलब्ध करून दिले आहे. इतकेच नव्हे तर दुर्गम भागात राहून शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना कला फाउंडेशन संस्थेच्या माध्यमातून बुक, पेन, वही वाटप असा उपक्रम राबवून समाजकार्य सुद्धा त्यांनी केलेले आहे. अशा प्रकारे अनेक ठिकाणी त्यांनी आपली कला अविरतपणे सुरू ठेवून विविध पुरस्कार सुद्धा मिळवले.
अशातच त्यांच्या हास्यात्मक कलेची दखल “शिक्षण महर्षी भाऊसाहेब देशमुख” या चित्रपटासाठी घेतल्याने प्रशांत दामले यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.!