आंबेडकर आणि गांधी
ती मला गांधी
सांगत होती
मी तिला
आंबेडकर सांगितला ….
परत काही दिवसांनी
ती भेटली
परत तीने मला
गांधी सांगितला
मी परत तीला
आंबेडकर सांगितला ….
ती मला वारंवार
गांधी सांगत होती
मी आंबेडकर …
काल मला ती
मोर्चात दिसली
आंबेडकरांचा फोटो
घेऊन
आरक्षणाच्या
घोषणा देत …..
राजेंद्र क.भटकर
बडनेरा
मो. 9011327691