अक्षय शिंदेचा एन्काऊंटरमध्ये मृत्यू .!
मुंबई : बदलापूरमधील (Badlapur Case) ज्या शाळेत चिमुरड्या मुलींवर अत्याचार झाल्याचं प्रकरण घडलं त्या बदलापूरच्या एका संस्थेच्या शाळेत दोन चिमुरड्यांवर अत्याचार केल्या प्रकरणी अक्षय शिंदेला (Akshay Shinde) अटक करण्यात आली होती. ठाणे पोलिसांच्या सीआययू यूनिटच्या पोलिसांनी तळोजा जेलमधून ताब्यात घेतलं होतं. मुंब्रा बायपास येथे पोहोचल्यावर अक्षय शिंदेनं पोलिसांकडून रिवॉल्वर हिसकावून घेत गोळीबार केला. त्यानं तीन राऊंड फायर केले त्यापैकी एक गोळी एपीआय निलेश मोरे यांना लागल्याचं सांगण्यात आलं. यावेळी पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे जखमी झाला आणि त्याला कळवा येथील रुग्णालयात नेण्यात आलं तिथं त्याला मृत घोषित करण्यात आलं.
दरम्यान, बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या एन्काऊंटरवर विरोधी पक्षांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. बदलापूरच्या शाळेच्या संस्थाचालकांना अद्याप अटक का झालेली नाही,असा सवाल विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात आला आहे.