पुन्हा नव्याने.!
कधी कधी आयुष्यात इतकी भयानक मरगळ येते की काही ही करू वाटत नाही.त्यावेळी व्यक्ती हा आओआप नैराश्य अर्थात तुम्ही म्हणता तसं डिप्रेशन मध्ये जातो आणि हळू हळू त्याचा फक्त जिवंत सांगाडा उरतोइतका तो त्या नैराश्य रुपी प्रवाहात वाहत जातो…..
त्याच्या मनातील भावनांचा इतका भयानक कोंडमारा होत असतो की त्याला अक्षरशः जगणं नकोशी वाटत असत , आणि हयातूनच किती तरी व्यक्ती व्यसनी होतात तर किती तरी ह्या जगाचा निरोप घेतात. त्यांनी घेतलेल्या ह्या भयानक निर्णयाच समर्थन मुळीच करता येणार नाही परंतु त्या व्यक्तींच्या समस्या जाणून घेऊन त्यावर त्यांना बोलत करून , कदाचित काही तरी मार्ग निघू शकतो नाही का ?
कारण कधी कधी एखाद्याला डोंगरा एवढी वाटणारी समस्या ही दुसऱ्याच्या लेखी सुई च्या टोका एवढी ही नसते. फक्त आपण मात्र मला काय त्याच म्हणून सोडून देतो. तसं न करता जर मदत करायची ठरवली तर किती तरी जणांच जगणं आपण सुंदर करू शकतो. कारण आनंदी जगण्या इतकं आयुष्यात काही ही सुंदर नाही. ते एखाद्या व्यक्ती साठी जर आपल्याला देता आलं तर विचार करा त्यातून मिळणारा आनंद किती मोठा असेल……
अशोक पवार
गटेवाडी पारनेर नगर